आदिवासी खावटी योजनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन ! आणि खावटी किट आदिवासी बांधवाना वितरित..

मुक्ताईनगर – प्रमोद कोंडे

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विभाग महामंडळ मर्या.नाशिक व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत खावटी योजनेचे उदघाटन व खावटी किट आदिवासी बांधवांना वितरणाचा कार्यक्रम मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा येथील शासकीय आश्रम शाळा प्रांगणात पार पडला.या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार श्वेता संचेती, गटविकास अधिकारी संतोष नागतीळक, यावल आदिवासी प्रकल्प अधिकारी प्रतिभा सोनवणे उपस्थित होते.
आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातंर्गत खावटी योजनेचे वितरण कोरोना पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी कर्ज स्वरूपातील खावटी वाटप योजना आता अनुदान स्वरूपात सुरू झाली आहे.या खावटी किट मधील वस्तु पुढीलप्रमाणे मटकी, चवळी, वटाणा , तुरदाळ, हरभरा, उडीद दाळ, गरम मसाला, मीठ, तेल, चहा पावडर, साखर, मिरची पावडर इत्यादी.किट मध्ये आदिवासी बांधवाना वितरित करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील , शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, युवासेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, शहर प्रमुख गणेश टोंगे, उपतालुका प्रमुख नवनीत पाटील , विनोद पाटील विभाग प्रमुख ( जि.प.गट कुऱ्हा वडोदा), कुरबान तडवी (सरपंच) व सर्व ग्रामपंचायत सदस्य जोंधनखेडा, नारायण पाटील, पुंडलिक सरक, पंकज पांडव, सतीश नागरे, जावेद खान, राजू तायडे, श्रावण धाळे, रशीद तडवी हकीम तडवी, बाळा पाटील, अमोल पाटील, शैलेंद्र पाटील, योगेश मुळक (सरपंच,भोटा), दिपक वाघ , अविनाश वाढे, पंकज धाबे, संदीप डिवरे, शिवा भोसले, विनोद ठोले,ज्ञानेश्वर कांडेलकर, अनिल पाटील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्रम शाळा जोंधनखेडा येथील शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!