सावदा येथील कन्या शाळेच्या घवघवीत यशाचा परंपरा यंदाही कायम इयता १० वी चा निकाल १०० टक्के.
सावदा येथील श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील कन्या विद्यालय चा निकाल शंभर टक्के लागला.
सावदा – १६ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत बोर्डाचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. त्यामध्ये सावदा येथील श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील कन्या विद्यालय चा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये विद्यालयातील कु. वृषाली बाजीराव तेली ही ९२.६० टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम आली. कु. अपर्णा राजेंद्र खारे ही विद्यालयातून दुसरी आली. तिला ८८.४० टक्के गुण मिळाले. तसेच प्रेरणा प्रकाश सापकर ही विद्यालयातून तिसरी आली तिला ८८ टक्के मिळाले.
त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे आणि सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे, पर्यवेक्षक पी.जी.भालेराव,
नगराध्यक्षा अनिता येवले, उपनराध्यक्ष विश्वास चौधरी, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, गटनेते अजय भारंबे,विरोधी गटनेते फिरोज पठाण, नगरसेविका नंदाबाई लोखंडे तसेच सर्व नगरसेवक शाळेतील शिक्षक शिक्षके्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.