जळगाव जलसंपदा विभागातील तब्बल ७८६ पदे रिक्त..
जळगाव जिल्ह्यातील जलसंपदा विभागांतर्गत अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता उपअभियंता कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रथम लिपिक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपीक वाहन चालक दप्तर कारकून कालवा निरीक्षक मोजणीदार कालवा चौकीदार शिपाई सीआरटी संवर्गातील ७८६
अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त झाल्याने या रिक्त अशा जागेवर नवीन पदस्थापना करून अतिरिक्त पडणारा कामाचा ताण तणाव हा कमी होणार आहे जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची रिक्त जागांमुळे बरेचशी काम ही रखडलेली आहे
यासंदर्भात राष्ट्रवादी युवती समन्वयक उत्तर महाराष्ट्र दिव्या भोसले यांनी मंत्रालयात जाऊन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे तरी मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिलेले आहे.