जननायक आ.मकरंद (आबा) पाटील यांच्या शुभहस्ते अहिरे गावातील विविध विकासकामांची वचनपूर्ती व सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण उपक्रम संपन्न…

जनसेवेचा ध्यास घेऊन उद्योजक नितीन ओव्हाळ यांनी निर्माण केला हिंदू-मुस्लिम ऐक्याचा नवा पॅटर्न.

हेमंत धायगुडे पाटील
खंडाळा: खंडाळा तालुक्यातील अहिरे गावच्या परिसरात कोरोना महामारीचा कहर वाढत असताना सर्व सामान्य जनतेचे प्राण वाचले पाहिजेत,या सामाजिक बांधिलकीतून प्रत्यक्ष कृतीवर भर देत समाजसेवेचे व्रत हाती घेणारे, गोर गरीब जनतेचा ऑक्सिजन जननायक आमदार मा.श्री.मकरंद (आबा) पाटील यांनी स्थानिक आमदार विकास कार्यक्रम निधीतून अहिरे गावातील विविध विकासकामांचे भूमीपूजन करत जनतेच्या विकासकामांची केली वचनपूर्ती व सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण उपक्रम संपन्न झाला.खंडाळा तालुक्यातील अहिरे गावात विविध विकासकामांचे जननायक आमदार मकरंद (आबा) पाटील यांच्या शुभहस्ते भूमीपूजन करत असताना लक्ष्मी माता मंदीर व सभा मंडपासाठी एकूण निधी: रूपये तेरा लक्ष त्यापैकी स्थानिक आमदार विकास कार्यक्रम निधीतून रूपये आठ लक्ष,ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रूपये पाच लक्ष तसेच अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील लोकांसाठी मस्जिद सभामंडप व संरक्षण भिंतीसाठी एकूण निधी:रूपये पंधरा लक्ष त्यापैकी स्थानिक आमदार विकास कार्यक्रम निधीतून रूपये दहा लक्ष,ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रूपये पाच लक्ष असा एकूण:रूपये अठ्ठावीस लक्ष निधी मंजूर करून खर्च करण्यासाठी उपलब्ध करण्यात आला.सोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे.हे कोरोना संसर्गाने सर्व सामान्य माणसाला दाखवून दिले आहे.हीच संधी ओळखून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन संकल्पाची मुहूर्तमेढ मेढ रोवली गेली.वृक्षारोपणामुळे अहिरे गावच्या सौंदर्यात भर पडली.
साधारणता अहिरे गावातील परिसरात एक हजार वृक्षलागवडीचा संकल्प अहिरे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी गावातील तरूण युवक,युवती,वडीलधारी मार्गदर्शक मंडळीनी वृक्षारोपण उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन अहिरे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रा.रविंद्र सोनवणे सर यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमात माजी कृषी सभापती सातारा जि.प. व जिल्हा परिषद सदस्य मनोज (भाऊ) पवार,उद्योजक नितीन ओव्हाळ साहेब,सचिन धायगुडे,अनिल धायगुडे सर,सरपंच रवींद्र सोनवणे, उपसरपंच दयानंद धायगुडे,
ग्रामपंचायत सदस्य सौ. स्नेहा मोहीते,सौ रुपाली जाधव, पोलीस पाटील आनंदा बोडरे,ग्रामविकास अधिकारी मल्हारी शेळके,विशाल धायगुडे, तानाजी धायगुडे,सुराजी धायगुडे,आबुराव जाधव,पोपट ओहाळ,मोहन धायगुडे,शिवाजी धायगुडे,सोपान धायगुडे,लतिफ काझी,आदम काझी,रोहिदास सोनवणे,इब्राहिम काझी, अल्लाउद्दीन काझी,बाळू काझी,
अजामुद्दीन काझी,तय्यब पठाण, जाकीर काझी,मुकुंद धायगुडे,
किसन धायगुडे,प्रताप धायगुडे, भिमसेन धायगुडे,आप्पा सोनवणे,
किरण सोनवणे,दादासो धायगुडे, नंदकुमार मोहिते,दत्तात्रय धायगुडे,इंद्रायण सोनवणे,संभाजी पवार,सुनील जाधव,चंद्रकांत जावळे,गौतमजावळे,जगताप, धनंजय जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

वचनपूर्ती
अहिरे गावच्या परिसरात लक्ष्मी माता मंदीर व अल्पसंख्यांक मुस्लिम समाज बांधवांसाठी मस्जिद समोर सभामंडप व संरक्षण भिंतीसाठी स्थानिक आमदार विकास कार्यक्रम व ग्रामपंचायतीच्या निधीतून तब्बल एकूण: रूपये अठ्ठावीस लक्ष निधी उपलब्ध करण्यात आला.
अहिरे गाव हे तालुक्यातील सुसंस्कृत,कर्तृत्वान,राजकीय,
सामाजिक पटलावरील उत्तुंग झेप घेणारे पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेले गाव आहे.ह्या गावाने तालुक्याला विधानपरिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली.दहा वर्षे पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनेक वेळा जनतेची सेवा करण्यासाठी संधी दिली.गावातील सर्व समाजातील लोकं गुण्यागोविंदाने राहत असल्याने जातीय सलोखा कायम ठेवण्याच्या प्रयत्नात नेहमीच अहिरे गाव अग्रेसर राहिले.खंडाळा तालुक्यातील अहिरे गावांने २००९,२०१४,२०१९ तिन्ही विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात बहुमताने मतदान रूपी आशिर्वाद देऊन जनतेने विजयी केले.कोरोनाच्या महामारीमध्ये शासकीय निधीची कमतरता असून देखील अहिरे गावात निधीची कमतरता भासू देणार नाही.अहिरे-धावडवाडी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.सोबतच बर्‍याच दिवसांपासून अहिरे-मोर्वे रस्त्याची अवस्था बिकट झाली असून या रस्त्याची पुन्हा दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. या गोष्टीची दखल घेऊन हा रस्ता जवळपास साडे पाच मिटर रूंदीचा होणार असल्याने पूर्वी पेक्षा रूंद होणार असल्याने वाहनधारकांचा मार्ग सुकर होणार आहे.या दोन्ही रस्त्यांची कामे पावसाळा संपल्यानंतर प्राधान्याने पूर्ण केली जाणार आहेत.अहिरे गाव कुठल्याही प्रकारच्या विकासकामांपासून वंचित राहाणार नाही.वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन सारख्या सामाजिक उपक्रम राबवून वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे.कोरोनाच्या काळात आपण सर्वांनी अनुभव घेतला त्यामुळे अॉक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून आपण स्वेच्छेने वृक्षारोपण सारखे उपक्रम राबविण्यात येत असल्याने विशेष कौतुक केले.तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे.असेच आपणा सर्वांचे प्रेम व सहकार्य माझ्यावर राहू द्या.

जननायक आ.मकरंद (आबा) पाटील
वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा क्षेत्र

हिंदू-मुस्लिम ऐक्याचा नवा पॅटर्न
अहिरे गावात एकाचवेळी लक्ष्मी माता मंदीर व सभामंडपासाठी तसेच मुस्लिम समाजासाठी मस्जिद समोर सभामंडप व संरक्षण भिंतीसाठी जननायक आ.मकरंद (आबा) पाटील यांच्या स्थानिक आमदार विकास कार्यक्रम निधीतून व अहिरे ग्रामपंचायतीच्या निधीतून तब्बल एकूण:रूपये अठ्ठावीस लक्ष निधी मंजूर करून उपलब्ध करण्यात आला.या दोन्ही विकासकामांचा शुभारंभ एकाचवेळी झाल्याने अहिरे गावच्या हिंदू-मुस्लिम समाजात ऐक्याचा व समतेचा नवा पॅटर्न निर्माण झाल्यामुळे समता, बंधुत्व,एकात्मता ही मूल्ये रूजली जातील.सोबतच अहिरे गावच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन संकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेल्याने गावच्या वैभवात व सौंदर्यात भर पडली आहे.एक हजार वृक्षलागवडीचा संकल्प असून जनतेला मोकळी हवा व शुद्ध अॉक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी वृक्षारोपण उपक्रमात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे.वृक्षारोपणामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल. मा.नितीन ओव्हाळ
काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनेल प्रमुख तथा उद्योजक

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!