धावली ते कोंढवली नवीन पुलाचा प्रश्न मार्गी: शासनाकडून ८० कोटींचा निधी उपलब्ध-सातारा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विराजभैय्या शिंदे यांच्या प्रयत्नांना यश.
वाई :प्रा.हेमंत धायगुडे पाटील
वाई तालुक्यातील पश्चिम भागातील धोम धरणाला फुलपाखराच्या आकारामुळे या जलाशयाच्या मागील बाजूस असलेल्या गावांत जाण्यासाठी साधारणता तब्बल ४० कि.मी. ते ५० कि.मी. अंतर वाई वरून जावे लागत असल्यामुळे लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी धावली ते कोंढवली असा धोम जलाशयामध्ये ७०० मीटर लांबीचा व ५०० मीटर जोड रस्ता असणारा मोठा पुल बांधणे अत्यंत आवश्यक आहे.धावली ते कोंढवली या पुलाचे नवीन बांधकाम केल्यामुळे एकूण २० कि.मी. ते २२ कि.मी. चे अंतर सोबत ५० ते ६० मिनिटाचा प्रवासाचा वेळ तसेच इंधनाची मोठी बचत होणार आहे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील भर पडणार आहे.याबाबतची मागणी करण्यासाठी सातारा जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराजभैय्या शिंदे यांनी तातडीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोलेंची भेट घेतली.नानाभाऊ पटोलेंनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण साहेबांकडे सह्याद्री अतिथीतीगृह येथे विराज भैय्या शिंदे यांच्या सोबत नानाभाऊ पटोलेंनी भेट करून दिली.तसेच अशोक चव्हाणसाहेबां समोर प्रश्न सोडवण्यासाठी विनंती केली.
प्रसंगी नानाभाऊ पटोलेंनी तत्परतेने दखल घेऊन वाई तालुक्यातील पश्चिम भागातील जनतेचा तब्बल ४० ते ५० वर्ष प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिफारसही केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्तीशा या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ ८० कोटींचा निधी त्वरित उपलब्ध करून आश्वासित करण्यात आले.ही समस्या दूर होणार असल्याने ग्रामस्थांच्या वतीने सातारा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विराजभैय्या शिंदे यांचे परिसरात कौतुक केले जात आह
समस्या सुटणार