पंचवीस कोटींच्या मंजूर पाणी पुरवठा योजनेचा अखेर मुहूर्त गवसला आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या हस्ते भुमिपुजन सोहळा संपन्न

24 तास पाणी वरणगावकरांच्या घरात पोहचविल्या शिवाय शांत बसणार नाही
आ संजय सावकारे भा ज पा

भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील.

भाजपा ने वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळे मुळे पाणी योजनेचे काम सुरू करावे लागले
माजी नगराध्यक्ष सुनील काळे
मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू व्हावे यासाठी वेळेवेळी जलसमाधीआंदोलन उपोषण रस्ता रोको हंडा मोर्चा परत आमरण उपोषण माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात आंदोलने करण्यात आली होती प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत अखेर आज 21 जून 2021 रोजी भाजपा सरकारने वरणगाव शहरासाठी 24 बाय 7 अशी 25 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन आज माजी मंत्री आ संजय सावकारे यांच्या शुभहस्ते व प्रांताधिकारी रामसिंग सुलाने मुख्यधिकारी समीर शेख गणेश चाटे माजी नगराध्यक्ष सुनील काळे उपनगराध्यक्ष शेख आखलाक शेख युसुफ मा नगरसेविका सौ माला मेढे मेहनाज बी पिंजारी सौ रुख्मिनी काळे सौ प्रणिता पाटील चौधरी सुनील माळी भाजपा शहराध्यक्ष,यांच्या प्रमुख उपस्तिथीत संपन्न झाले व हाजी अल्लउद्दीन सेठ ऍड ए जी जंजाळे माजी सरपंच सुभाष धनगर , कृष्णा माळी संदीप माळी , डॉ प्रवीण चादणे दत्तू मराठे मिलिंद भैसे शामराव धनगर गोलू राणे नटराज चौधरी रमेश पालवे असंख्य शेकडो महिला तरुण उपस्तीत होते.

यावेळी आमदार संजय सावकारे म्हणाले की आज माझ्या वरणगाव करांना 24 तास पाणी मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही भाजपा ने जनांदोलन केली म्हणून शासनाला या कामाला सुरुवात करावी लागली या योजनेच्या कामाला गती मिळाली व यापुढे काम पूर्ण होई पर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असे आमदार सावकारे म्हणाले
माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की मंजूर वरणगाव पाणी पुरवठा योजना तत्कालीन मुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस व माजी मंत्री गिरिषभाऊ महाजन खासदार रक्षाताई खडसे माजी मंत्री संजयजी सावकारे यांच्या प्रयत्नांनी 24 बाय 7 ची 25 कोटी ची योजना भाजपा च्या काळात मंजुर झाली मात्र महाविकास आघाडी ने स्थगिती आणून आडथळे आणले मात्र भाजपा ने रस्ता रोको जलसमाधी उपोषण हंडा मोर्चा आणला शुक्रवारी महिला आघाडी तर्फे आमरण उपोषण केले त्यावेळीच प्रशासनाने 24 जूनच्या आत पाणी योजनेच्या कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिले त्यामुळेच आज पाणी पुरवठा योजनचे काम सूर करण्यास प्रशासनाला भाग पाडले याचे सर्व श्रेय भाजपा च्या कार्यकर्त्यांना देतो व 24 तास पाणी वरणगाव करांच्या घरात पोहचल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यावेळी म्हणाले.

यावेळी भाऊलाल टिंटोरे किरण वंजारी कमलाकर मराठे तेजस जैन कामगार नेते मिलिंद मेढे कुंदन माळी संगीता माली जयश्री अवतारे कस्तुराबाई इंगळे यांच्यासह असंख्य महिला व नागरिक उपस्तीत होते.

✍🏻दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण आपल्या परिसरातील बातमी 95940 47437 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपण आपल्या नावाने बातमी दिल्यास आमच्या दैनिक मध्ये प्रसिद्धी केली जाईल.
आपला विश्वासू
प्रशांत पाटील
भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
95940 47437

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!