सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था “स्नेहबंध आदर्श संस्था” पुरस्काराचे मानकरी
भुसावळ(प्रतिनिधी)-
येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेचे सामाजिक कार्य पाहता त्यांना स्नेहबंध आदर्श संस्था पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुरुवर्य बलभीम भगवान गावडे व गुरुवर्य रामचंद्र हक्के यांच्या सन्मानार्थ हरिश्चंद्र फाउंडेशनच्या वतीने राज्यभरातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेचे सामाजिक कार्य पाहता त्यांना हा पुरस्कार एकमताने जाहीर करण्यात आल्याचे फाउंडेशन अध्यक्ष पंढरीनाथ कदम यांनी सांगितले. सदर पुरस्काराचे वितरण रविवार १७ ऑक्टोबर रोजी सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी निवड पत्राद्वारे कळविले आहे. सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.