ग्रामीण रुग्णालयात तुटपुंज्या वेतनावर कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांची पिळवणूक
दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील
वरणगाव शहर ग्रामीण रुग्णालय येथे कॉन्ट्रॅक्ट मधील तीन कर्मचारी कायमस्वरूपी कर्मचारी प्रमाणे वेळेवर दैनंदिन सेवा बजावत असतात व या कर्मचाऱ्यांना महिन्याला पाच हजारापर्यंत तुटपुंज्या वेतनावर काम करून घर खर्च भागवावा लागतो
अधिकची माहिती मिळाली असता वरणगाव येथील कायम कर्मचारी यांचा पगार पंचवीस ते पस्तीस हजारापर्यंत असताना कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करणाऱ्यांना पाच हजारच का
जे कि कोरोना सारख्या महामारी मध्ये कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच खांद्याला खांदा लावून या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावत वरणगाव वासियांना पूर्णपणे मेहनत घेऊन सेवा दिली असता समान काम करून पण मग आमच्यावर हा अन्याय का होत आहे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे
या सर्व विषयाची माहिती रावेर लोकसभा क्षेत्र उपजिल्हा संघटन शिवसेना माननीय श्री विलास जी मुळे यांना कळताच क्षणाचाही विलंब न करता
जळगाव व चोपडा लोकसभा क्षेत्र जिल्हाप्रमुख शिवसेना माननीय श्री समाधान महाजन सर यांच्याशी विचार विनिमय करून याविषयी आदेश घेऊन
पंचायत समिती सदस्य भुसावळ माननीय विजय सुरवाडे व निलेश ठाकूर शिवसैनिक सागर वंजारी शिवसैनिक सह
वरणगाव ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन मेडिकल ऑफिसर डॉक्टर अविनाश भगवान सुरवाडे वरणगाव यांना निवेदन देऊन लवकरात लवकर कामगारांना न्याय मिळवून द्यावा व योग्य तो पगार देऊन कायमस्वरूपी करण्यात यावे अशी शिवसेनेच्या पदाधिकार्यांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे