संदीप पोटिंदे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी – ( पांडुरंग दोंदे )

त्र्यंबकेश्वर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा झंझावात चालू असुन दि. 2 ऑक्टो.रोजी वाघेरा उच्च शिक्षित व युवा नेतृत्त्व संदीप पोटिंदे यांनी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली व वाघेरा गण प्रमुख राम जाधव यांच्या पुढाकाराने वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यांच्यावर तालुका सरचिटणीस ही जबाबदारी देऊन वंचितच्या पदाधिकार्यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.

यावेळी तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे यांनी सांगितले की, तालुक्यात पाणीटंचाई, शिक्षण, रोजगार , कुपोषण, स्थलांतर आदी प्रश्न असुन स्वातंत्र्याच्या 75वर्षांनंतरही जनतेचे प्रश्न जैसे थे असुन येणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी अठरा पगड जातींना सोबत घेऊन निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. संदीप पोटिंदे यांनी सांगितले की, तालुक्यातील जनतेचे प्रश्न वंचित बहुजन आघाडी सोडविणार आहे.

याप्रसंगी त्र्यंबकेश्वर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे, त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष मोहन सोनवणे, वाघेरा गण प्रमुख राम जाधव , संघटक अनिल गांगुर्डे, युवक उपाध्यक्ष नितीन काशीद, सम्यक विद्यार्थी शहराध्यक्ष अविनाश जाधव आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!