पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधी पक्षावर टीका; म्हणाले…’2.5 कोटी लोकांनी लस घेतली, पण ताप आला एका पक्षाला
नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतात कोविड लसीची विक्रमी नोंद करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 18 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड लसीच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी देशभरातील डॉक्टर आणि कोरोना योद्धांना त्यांच्या प्रयत्नांसाठी अभिनंदन केलं आहे. यावेळी पीएम मोदींनी अप्रत्यक्षपणे काँग-ेस नेत्यांवर टीका केली आहे.
पंतप्रधान मोदींनी यावेळी काँग-ेसवर निशाणा साधला आणि म्हटलं की, एका दिवसात 2.5 कोटींहून अधिक लसीकरणानंतर, कोविड -19 लसींचा दुष्परिणाम म्हणून तापाबद्दल चर्चा होत आहे.
शनिवारी गोव्याच्या आरोग्य कर्मचार्यांशी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान, पीएम मोदींनी उपस्थित असलेल्या डॉक्टरांना टोमणा मारण्याच्या स्वरात विचारलं की, ’काल अडीच कोटी लोकांना लस मिळाली, मग एका पक्षाला ताप का आला?’ हे ऐकून डॉक्टरही हसले.
गोव्यातील 100 टक्के लोकसंख्येला कोविड -19 प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिल्याने आरोग्य कर्मचारी आणि लसीकरण लाभार्थ्यांशी संवाद साधताना मोदींनी ही मिश्किलपणे टीका केली आहे.
पीएम मोदी म्हणाले, आम्ही ऐकलं आहे की जेव्हा लसीकरण होतं, जो लस घेतो, 100 पैकी फक्त एकाला थोडीसा त्रास होतो, ताप येतो… आणि असेही म्हटलं जातं की जर जास्त ताप असेल तर मानसिक संतुलन देखील निघून जाते. मी हे पहिल्यादांच बघतोय की 2.5 कोटीपेक्षा जास्त लोकांना लस मिळाली आणि काल रात्री 12 नंतर एका राजकीय पक्षाची प्रतिक्रिया आली. त्याचा ताप वाढला. याला काही तर्क असू शकेल का?
शुक्रवारी काँग-ेसच्या भारतीय युवा काँग-ेसनं पंतप्रधानांचा वाढदिवस ’राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ आणि महिला शाखा अखिल भारतीय महिला काँग-ेसने ’महागाई दिवस’ म्हणून साजरा केला. काँग-ेसने शुक्रवारी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मात्र त्यांच्या सरकारच्या अपयशांचा उल्लेख करत त्यांचा वाढदिवस ‘बेरोजगारी दिवस‘, ‘शेतकरी विरोधी दिवस‘, ‘कोरोना गैरव्यवस्थापन दिवस‘ आणि ‘महागाई दिवस म्हणून साजरा केला.