भाजप कडून पाणीपुरवठा मंत्रीचा धरणगावात पाणी टंचाईवरून काळे झेंडे दाखवून निषेध
धरणगाव प्रतिनिधी
धरणगाव शहरात गेल्या 20 ते 25 वर्षांपासून पाणी टंचाई आहे,अजूनही पंधरा ते वीस दिवसापासून नळाला पाणी आलेले नाही अशा पाण्याचा बिकट प्रश्नामुळे नागरिक त्रस्त आहेत मतदारसंघाचे आमदार आता पाणीपुरवठा मंत्री आहेत परंतु पाण्याचा प्रश्न न सोडवता मंत्री पाटील यांच्या शिवसेनेचे सत्ताधारी नगराध्यक्ष, नगरसेवक नागरीकांची मागणी नसतांना गल्लोगल्ली रस्त्यावर नित्कृष्ट पद्धतीने फेव्हर ब्लॉक बसवुन आर्थिक मलई लाटत आहेत,महात्मा गांधी उद्यानाचे सुशोभीकरणाचा नावाखाली जिवंत झाडाची कत्तल नगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे.आज पाणीपुरवठा व पालकमंत्री हे महात्मा गांधी उद्यानाच्या उदघाटन करण्यासाठी धरणगावात येणार होते,ही संधी पाहून झोपेचे सोंग घेणारे पाणीपुरवठा मंत्र्यांना जाग यावी म्हणून भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार होता परंतु पालकमंत्री यांना तशी कुणकुण लागताच त्यांनी आपला मार्ग बदलवून भाजपच्या आंदोलकांना चकवा देत महात्मा गांधी उद्यान गाठले.परंतु भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यानी देखील कार्यक्रम ठिकाण गाठले व काळे झेंडे दाखवून संपूर्ण परिसर पाणीपुरवठा मंत्रीचा धिक्कार असो,पाणी द्या पाणी पालकमंत्री पाणी द्या,ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचेअश्या घोषणांनी दणाणून टाकला.सरतेशेवटी ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन यांनी प्रतिक्रिया दिली की आपले पाणीपुरवठा मंत्री हे दुसऱ्या जिल्ह्यात भाषणे देऊन सांगतात की तुमच्या कडे पाणी पाणी करून टाकेल.मग स्वतःच्या मतदारसंघातील धरणगावात आपण वीस वर्षांपासून काय करत आहात.प्रत्येक निवडणूकीत धरणगावातील जनतेला पाण्यासाठी आमिषे दाखविली 6 महिन्यात,1 वर्षात,2 वर्षात,आता म्हणतात 2 महिन्यात नवीन पाईप लाईनचे काम सुरू होईल असे हे फेकू आमदार आहेत.आणि आज फक्त काळे झेंडे दाखविले आहे जर का आमच्या सहनशीलतेचा अंत पाहाल तर तुम्हाला गावात घुसू देणार नाहीत.म्हणून लवकरात लवकर धरणगावाची पाण्याची समस्या सोडवावी.त्याच बरोबर आज उदघाटन सोहळा नसून म.गांधी उद्यानातील झाडांचा कत्तलीचा सोहळा आहे आणि भारतीय जनता पार्टी झाडांची कत्तल होऊ देणार नाही असा इशारा भाजपने दिला.निषेध करते समयी भाजप नेते शिरिषआप्पा बयास,ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड. संजय महाजन तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,तालुकाउपाध्यक्ष पुनीलालआप्पा महाजन,प्रकाश दादा सोनवणे,शहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर,ता.सरचिटणीस ललित येवले,नगरसेवक शरद अण्णा धनगर,कडुअप्पा बयास,सुनील चौधरी,आबा पाटील,डोंगर चौधरी,आनंदा धनगर,सरचिटणीस कन्हैया रायपूरकर,मिडिया प्रमुख अनिल बडगुजर ,राजू महाजन,शरद भोई,जुलाल भोई,अनिल महाजन,सुधाकर धनगर,किशोर माळी,युवा मोर्चा अध्यक्ष भूषण धनगर,निलेश महाजन,शुभम चौधरी,रवी पाटील,योगेश महाजन,लहू महाजन,विक्की महाजन,किरण धनगर,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.