सावधान! राज्यात तब्बल 48 हजार फेसबुक युजर्सचे अकाऊंट हॅक
मुंबई,
राज्यभरातील 48 हजार फेसबुक हॅकर टोळ्यांनी युजर्सची खाती हॅक करून त्याचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे . कळस म्हणजे ज्यांची खाती हॅक झाली त्यात पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकार्यांचा देखील समावेश आहे. अँड्रॉईडवरील अॅप्स डाऊनलोड केल्याने गोपनीय डेटा चोरीला जात असतो त्यातूनच खाते हॅक होत असल्याची माहिती सायबर सेलच्या अधिकार्यांनी दिली आहे. अँड्रॉईड मोबाईलवर डाऊनलोड करण्यात आलेल्या काही ?प्सच्या माध्यमातून युजर्सच्या फेसबुकचे पासवर्ड चोरले गेल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहेष्ठ
अलीकडे सायबर गुन्हेगार हे वेगवेगळ्या पद्धतीची मोडस ऑॅपरेंडी वापरून लोकांची फसवणूक करत आहेत. गेल्या सात महिन्यांत राज्यभरातून 48 हजार फेसबुक युजर्सची अकाऊंट हॅक झाली आहेत. राज्याच्या एटीएस प्रमुख शिवदीप लांडे यांचे खाते हॅक करण्यात आले होते. तिथून हॅकर्सचा शोध सुरू झाला. फेसबुक हॅकर्सच्या कचाट्यातून बड्या नेत्यांसह पोलीस दलातील अति उच्चपदावरील अधिकारी देखील सुटलेले नाहीत. हॅकर्सनी राज्यताल्या प्रत्येक जिल्ह्यातील खाती हॅक केली आहेत.
सायबर पोलिसांना जी माहिती मिळाली त्यानुसार युजरच्या गुगल किंवा फेसबुक अकाऊंटवर गेल्यावर विविध ?पच्या बनावट जाहिरात दिसतात. युजर जाहिरातींना क्लिक करतात. जाहिरातीतील ?प अकाऊंटवरील कुकीज आणि पासवर्डची चोरी करतात.त्यामुळे कोणतेही ?प डाऊनलोड करताना त्याची खात्री करा आणि सतत पासवर्ड बदलत राहा.