अहिल्या देवी होळकर यांच्या २९६ व्या जयंती निम्मित मनोगत
सर्व प्रथम लोकमाऊली अहिल्यादेवी होळकर यांच्या 296व्या जयंती निमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा
आपल्या सर्वांना माहिती आहे की आईसाहेब अहिल्यादेवी होळकर या उचित न्याय दानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे व नदिघाट बांधले, किंवा त्यांच्या जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदोर या गावांना सुंदर बनविले त्या अनेक देवळाच्या आश्रय दात्या होत्या . त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, नाशिक, परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अहिल्याबाईंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती. आज आम्ही ही त्यांचा विचारांचा वारसा राष्ट्रवादी काँग्रेस परिवारच्या माध्यमातून पुढे घेऊन जात आहोत. आईसाहेब यांनी शिकवल्या प्रमाणे ९९%समाजसेवा व १%राजकारण हाच उद्देश मी मनाशी बाळगून पुढे जात आहेगेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जगात कोव्हीड19 सारख्या महामारीत समाजसेवा करण्याचा मला योग मिळाला , गरजू लोकांना किराणा , भोजन व्यवस्था, कामगारांना राहण्याची व्यवस्था , तसेच सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक उत्सव , असे अनेक कार्यक्रम आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे घेत असतो , यात मला आमचे , राष्ट्रवादी काँग्रेस चे महानगराध्यक्ष अभिषेक भाऊ पाटील , युवक चे अध्यक्ष स्वप्नील भाऊ नेमाडे , नाथ फाउंडेशन चे अध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी , आमचे सहयोगी नितीन जाधव, किर्तीकुमार पवार , यांचे अनमोल सहकार्य मला वेळोवेळी मिळत असते.