जातनिहाय जनगणनेची मागणी : ’आशा आहे की पंतप्रधान सकारात्मक निर्णय घेतील’

मुंबई,

देशातील अनेक पक्ष जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर सकारात्मक निर्णय घेतील, अशी आशा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. आज (सोमवार) बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि इतर पक्षांचे प्रमुख नेते जातनिहाय जनगणना व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यावर बोलताना नवाब मलिक यांनी हे मत व्यक्त केले आहे.

नवाब मलिकांनी करुन दिली आठवण –

देशभरातून जातीनिहाय जनगणनेच्या मागणी होत असली तरी, अधिवेशनात संसदेच्या पटलावर गृहमंत्री अमित शाह यांनी देशात जनगणना होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. जातीनिहाय जनगणनेमुळे इम्पिरिकल डेटा गोळा करायला मदत होईल. शिवाय ओबीसींचे अनेक प्रश्न त्यामुळे सुटतील, असेही नवाब मलिक म्हणाले. मागच्या सरकारनेसुध्दा जातनिहाय जनगणना करण्याचे सुचवले होते. याची आठवण नवाब मलिक यांनी यावेळी करुन दिली आहे.

राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारकडूनदेखील जातिनिहाय जनगणना व्हावी यासाठी वेळोवेळी मागणी केली जात आहे. राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर ही मागणी जोर धरू लागली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग-ेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन करण्याची मागणी केली होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!