नाशिकच्या लाचलुचपत विभागाने पकडला,दोंडाईचा पोलीस स्टेशनचा लाचखोर हवलदार….

दैनिक महाराष्ट्र सारथी नाशिक प्रतिनिधी यांचेकडून

दोंडाईचा-

काल दिनांक २५ मे मंगळवार रोजी रात्री दहा वाजता दोंडाईचा पोलीस काँलनीतील रिकाम्या खाली पडलेल्या निवासस्थानी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदाराच्या फिर्यादीवरून सापडा रचत अठरा हजाराची लाच स्विकारताना दोंडाईचा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवलदार विजय शंकरराव मोरे (वय ५०) याला रंगेहाथ पकडले आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रामी ता. शिंदखेडा येथील तक्रार धारक योगेश संतोष कोळी व त्याचे नातेवाईक विरूद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात, सदर गुन्ह्याचे दोषारोप पत्र मा.न्यायालयात दाखल न करता सदर गुन्ह्यात ब वर्गात समरी पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दिनांक २५ मे मंगळवार २०२१ रोजी २००००/ व रुपये तडजोडी अंती १८०००/ रूपयेची लाचेची मागणी करून ती दिनांक २५ मे मंगळवार २०२१ रोजी दोंडाईचा पोलीस स्टेशनच्या पाठीमागील रिकामे खाली पडलेल्या निवासस्थानी स्विकारली. म्हणून तक्रार याच्या फिर्यादीवरून दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी सापळा यशस्वी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्री सुनील कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक श्री निलेश सोनवणे, पोलीस उप-अधीक्षक वाचक विभाग श्री विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस निरीक्षक श्री उज्वलकुमार पाटील, पोलीस हवलदार दिपक कुशारे,सचीन गोसावी, पोलीस नाईक एकनाथ बावीस्कर,प्रकाश डोंगरे,चालक पोलीस शिपाई जाधव आदींनी मेहनत घेतली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!