शिवसेना मदत कक्षाला रिक्षा चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी

शिवसेना जळगाव महानगर तर्फे शिवसैनिक विराज कावडीया यांच्या नेतृत्वात पांडे चौक येथे रिक्षा चालक बांधवांसाठी मदत कक्ष सुरू करण्यात आले.

याचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देशमुख, माजी महापौर नितिन लढ्ढा, शिवसैनिक विराज कावडीया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी महापौर विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, नगरसेवक प्रशांत नाईक, नितिन बरडे, अनंत जोशी, गणेश सोनवणे, मनोज चौधरी, शिवसेना महिला महानगर प्रमुख शोभा चौधरी, शिवसैनिक विराज कावडीया, जितेंद्र छाजेड, प्रकाश कावडीया उपस्थित होते.

25 ते 5 जून पर्यंत शहरातील परमीटधारक रिक्षाचालक बांधवांना ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील 7 लाख 15 हजार परमिटधारक रिक्षा चालकांना लॉकडाऊच्या पार्श्वभूमीवर अर्थसहाय्य म्हणून 1 हजार 500 रूपये घोषीत करण्यात आले आहे. सदर रक्कम परमिटधारक रिक्षाचालकांच्या बँक खात्यात जमा होणार असून यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. यासाठी आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, लायसन्स, बॅच, रिक्षा परवाना इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. शिवसेना मदत कक्षाला वेलकम सायबर कॅफे यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.
तरी जास्तीत जास्त रिक्षा चालक बांधवांनी या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसैनिक तथा युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया यांनी केले आहे.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसैनिक अमित जगताप, उमाकांत जाधव, प्रितम शिंदे, अर्जून भारूळे, गोकूळ बारी, पियुष हसवाल, गणेश भोई, राहूल चव्हाण, अमोल गोपाल, संकेत छाजेड, दिपक नेटके, अशफाख शेख, संदिप सुर्यवंशी, नवल गोपाल, मनोज चव्हाण, विपिन कावडीया इ. परिश्रम घेत आहेत.

कुटूंब तुमचे जबाबदारी आमची..
जळगांव शहरात कुठेही कोरोना पोसिटीव्ह रुग्ण आढळल्यास कॉल करा संपूर्ण घर मोफत सॅनिटायझर करून मिळले…
जनमत प्रतिष्ठान..
पंकज नाले..
“जन सेवा हिच ईश्वर सेवा’
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!