आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाचे, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व आमदार श्री.अनिल भाईदास पाटील यांना निवेदन सादर
जळगाव प्रतिनिधी –
महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात, जळगांव जिल्हा ठाकूर जमात सेवा मंडळ ,अमळनेर आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळातर्फे धुळे येथिल मंजूर अनुसूचित जमात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय नंदुरबार येथे हलविण्याच्या आदिवासी निर्णयाच्या विरोधात जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री ना.गुलाबराव पाटील यांची पाळधी येथे निवास स्थानी, महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी सदर निर्णयाबाबत सविस्तर चर्चाही करण्यात आली.सदर विषय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊ असे आश्वासन यावेळी ना.गुलाबराव पाटील यांनी दिले.
जळगांव येथे मा.आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे व त्यांचे वकील ऍड.श्री.भोलानेकर यांचेशी सविस्तर कायदेशीर चर्चा करण्यात आली.आ.सौ.लताताई सोनवणे यांनी केलेला पत्रव्यवहार व पाठपुराव्याचे अनेक कागदपत्रे यावेळी मा.आ.सोनवणे यांनी दाखवले.तसेच मा.मुख्यमंत्री यांचेकडे याबाबत सदर विषय पुन्हा उचलून धरू! असे यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्य मंडळाचे सरचिटणीस रणजित शिंदे यांचे सोबत भुसावळ जिल्हा अध्यक्ष मा. गोपाळराव ठाकूर तसेच पाळधी चे युवा पदाधिकारी श्री. प्रशांत ठाकूर तसेच उपाध्यक्ष श्री एस.पी.ठाकूर सर, जळगांव युवा सेना व समाज कार्यकर्ते श्री महेश ठाकूर ,गौरव ठाकूर हे उपस्थित होते .धुळे तालुका ठाकूर समाज अध्यक्ष व सेना ता. उपप्रमुख श्री दिनेश देवरे ,अमळनेर येथील अध्यक्ष श्री दिलिप ठाकूर,सचिव श्री प्रकाश वाघ यांची उपस्थिती लाभली,