रेल्वे संघर्ष समितीच्या पाठपुराव्यास अखेर यश! भुयारी मार्गासाठी रेल्वे प्रशासनाकडून हालचाली

जालना,

जालना रेल्वे स्थानकानजीक गेट नं. 78 जवळ भुयारी मार्ग व्हावा यासाठी जालना रेल्वे संघर्ष समितीतर्फे गत पंधरा वषार्ंपासून सुरु असलेल्या पाठपुराव्यास अखेर यश प्राप्त झाले असून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या निर्देशानुसार भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत . नांदेड विभागाचे प्रबंधक भुपेंद्रसिंग, विभागीय अभियंता श्रीनिवास राव, एस. एस. ओरियन व स्थानिक अधिकारी यांनी नुकतीच भुयारी मार्गाच्या कामांची पाहणी केली.

या संदर्भात अधिक माहिती देताना रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेशलाल चौधरी व महासचिव फेरोज अली यांनी सांगितले की, रेल्वे स्थानकात मालगाड्या उभ्या राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. नागरिकांना तासन् तास ताटकळत उभे राहावे लागते. येथून दररोज 30 ते 40 हजार नागरिक ये-जा करतात .तथापि गेट बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने या गंभीर समस्येवर उपाय म्हणून येथे भुयारी मार्ग होण्यासाठी रेल्वे संघर्ष समिती मागील पंधरा वषार्ंपासून निवेदने, आंदोलने करून पाठपुरावा करत आहे. याची दखल घेत सन 2014- 15 च्या रेल्वे अर्थसंकल्पात भुयारी पुलासाठी तीन कोटी 24 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला. असे गणेशलाल चौधरी व फेरोज अली यांनी नमूद केले.

सदर कामासाठी ना हरकत पत्र तसेच परिसरातील सांडपाणी व्यवस्था व भुयारी गटार नगरपरिषद हद्दीत सोडण्या साठी लागणार्‍या 65 लक्ष रुपयांच्या निधी बाबत रेल्वेने नगरपरिषदेकडे मागणी केली होती . वरिष्ठ पातळीवरून पत्रव्यवहारही झाले. मात्र नगरपरिषदेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर रेल्वे संघर्ष समितीने स्वातंर्त्यदिनी धरणे आंदोलन केले आ. कैलाश गोरंट्याल यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन नगरपरिषदे मार्फत भुयारी गटारचे काम करण्याचे आश्वासन दिले. असे सांगून गणेशलाल चौधरी व फेरोज अली म्हणाले, ना. रावसाहेब पाटील दानवे यांनी औरंगाबाद येथील भेटीत सदर भुयारी मार्गाचे काम सुरू करण्याबाबत नांदेड विभाग प्रबंधकांना सूचना दिल्या. त्या अनुषंगाने उपेंद्र सिंग यांनी कामांची पाहणी केली असून पुढील आठवड्यात काम सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे उद्या जालना शहरात येत असून कामास गती दिल्याबद्दल समितीतर्फे त्यांचा सत्कार केला जाईल असे फेरोज अली यांनी स्पष्ट केले. धरणे आंदोलनात समितीचे अध्यक्ष गणेशलाल चौधरी, कार्याध्यक्ष सुभाषचंद्र देवीदान, महासचिव फेरोज अली, बाबुराव सतकर,अभय कुमार यादव, विनीत साहनी,संतोष गाजरे, रमेश अग्रवाल, अनया अग्रवाल ,दिनकर घेवंदे, छोटे खॉ.पठाण, मिर्झा अन्वर बेग, गणेश सुपारकर, शेख अन्नु , सुरेश सदगुरे, यांच्यासह नागरिकांनी सहभाग नोंदवला.

चौकट..

ना .दानवे यांनी शब्द पाळला: सुभाषचंद्र देवीदान

रेल्वे मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जालना रेल्वे संघर्ष समितीने ना. रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेऊन भुयारी मार्ग, रखडलेला जालना -खामगाव रेल्वे मार्ग ,मनमाड ते परभणी पयर्ंत दुहेरीकरण, विद्युतीकरण ,पॅसेंजर गाड्या नियमित सुरू कराव्यात यासह रेल्वे विकासाबाबत आग्रही मागण्या केल्या होत्या. तथापि भुयारी मार्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन ना. दानवे यांनी समिती समक्ष रेल्वे प्रशासनास कामाची पाहणी करून सदर भुयारी मार्ग मार्गाच्या उभारणीसाठी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने रेल्वे मंत्रालयाकडून हालचाली सुरू झाल्या असून ना .दानवे यांनी समितीस दिलेला शब्द पाळला. अशी प्रतिक्रिया रेल्वे संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सुभाषचंद्र देवीदान यांनी दिली .तथापि नियमित रहदारीचा रस्ता असल्याने सदर काम गुणवत्तापूर्ण व्हावे .अशी अपेक्षाही श्री. देवीदान यांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!