आदिवासींच्या शासकीय योजना तळा गळा पर्यंत पोहविण्यासाठी कटिबद्ध…… गटविकास अधिकारी

रावेर ( प्रतिनिधी)-

आदिवासी बांधवांना शासकीय योजनांची माहिती वेळोवेळी देऊन पेसा अंतरगत असलेल्या गावाचा विकास करणे व तेथील आदिवासी बांधवांना. शिक्षण घेऊन तसेच त्याची संस्कृती जपून ठेवत परंपेप्रमाणे सण उत्सव साजरे करावे व प्रामुख्याने आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे प्रतिादन रावेर येथे आयोजित आदिवासी दिना निमित्त गट विकास अधिकारी कोतवाल यांनी केले .
रावेर पंचायत समिती येथे ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन तर्फे पंचायत समिती सभागृहात बिरसा मुंडा व शाहिद भगतसिंग यांच्या यांना पुष्पहार माल्यार्पण करून आदिवासी दिवस साजरा करण्यात आला साजरा
यावेळी गटविकास अधिकारी कोतवाल , माजी प स सभापती जम्मा तडवी यांनी आदिवासी बंधू बघिणीना प्रथमतः आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या त्यानंतर रावेर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती परंपरा जतन करून ठेवली आहे जसे भोंगर्‍या बाजार ही अभिमानास्पद गोष्ट आहे ।त्याच प्रमाणे परंपरा व संस्कृती सर्व बांधवांनी जपून ठेवावी व आपणास शिक्षण क्षेत्रात आदिवासी मुले मुली यांच्याकरिता काय करता येईल असे गट विकास अधिकारी यांनी संघटनेमार्फत काही नवीन संकल्पना काही नियोजन करून पेसा क्षेत्रांतर्गत येणारा निधी सदर आदिवासी मुलांकरिता खर्च करावा व याच्यातून मुले मुली यांना सुसंस्कृत बनवून दिशा देण्याचे काम व मुख्य प्रवाहत आणण्याचे प्रयत्न करावे तसेच आदिवासी सणांची जोपासना करून त्यातून संस्कृती जतन करावी । आदिवासी महिला बचत गटांना पुढे आणण्याचा प्रयत्न करेल तसेच सर्व पेक्षा ग्रामपंचायतींना भेटी देऊन व इथल्या आदिवासींच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न व सोडवण्याचा व मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करेन।असे मनोगतात व्यक्त केले*

सदर कार्यक्रमास पंचायत समिती आदिवासी सदस्य जुम्मा भाऊ तडवी ,समीर तडवी अभियंता (वीज वितरण कंपनी), संघटनेचे महिला उपाध्यक्ष डॉक्टर सोनाली बारेला , सचिव परवीन तडवी, महिला संघटक आफ्रीन तडवी , रुकसाना तडवी सदस्य , ओनसिंग बारेला सदस्य,रेखा जमादार सदस्य,हिदायत तडवी सदस्य, तसेच पंचायत समिती कार्यालयीन सर्व कर्मचारी,अधिकारी स्टाफ उपस्थित होता आफ्रीन तडवी यांनी प्रस्तावना सादर केली तसेच अजित जमादार तालुका अध्यक्ष आदिवासी चित्रकला वारली पेंटिंग म.गटविकास अधिकारी यांना सप्रेम भेट देऊन उपस्थितांचे आभार मानले।

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!