मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन; कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करणार

कोल्हापूर, दि. 30 -: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार जयंत आसगावकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया आदी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर येथे आले आहेत. या दौऱ्यामध्ये ते शिरोळ परिसर, कोल्हापूर येथील शाहूपुरी 6 वी गल्ली, गंगावेश, शिवाजी पूल आदी भागांतील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. यानंतर शासकीय विश्रामगृह येथे प्रशासकीय यंत्रणेसोबत आढावा बैठक घेणार आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!