महावितरणच्या आवाहनास प्रतिसाद वीज ग्राहकांनी 310 कोटी भरले
कोल्हापूर प्रतिनिधी
20 जुलै
महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता थकबाकी वसूली आवश्यक आहे. त्यामूळे वीज बिलांच्या वसूलीची मोहिम गतीमान करण्यात आली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी महावितरणच्या आवाहनास प्रतिसाद दिला आहे. मागील 20 दिवसात वीज ग्राहकांनी चालू व थकीत वीज बिलाचा 310 कोटी 20 लक्ष रुपयांचा भरणा केला आहे. अद्यापही 488 कोटी रुपये वीज बिल थकले आहे. तेंव्हा ग्राहकांनी कटू कारवाई टाळण्यासाठी वीज बिले भरुन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता (प्र.) श्री. अंकुर कावळे यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात लघुदाब व उच्चदाब वर्गवारीतील (कृषी वगळून) 540 कोटी 21 लक्ष रुपये वीज बिलांच्या वसूली उद्दिष्टापैकी 215 कोटी 94 लक्ष रुपये साध्य झाले आहे. सांगली जिल्ह्यात 258 कोटी 25 लक्ष रुपये वसूली उद्दिष्टापैकी 94 कोटी 27 लक्ष रुपये साध्य झाले आहे. इचलकरंजी विभागातून 31 कोटी 83 लक्ष रुपये, कोल्हापूर शहर 19 कोटी 79 लक्ष तर सांगली शहर विभागातून 16 कोटी 85 लक्ष रुपयांच्या वीज बिलाचा भरणा ग्राहकांनी केला आहे. दैनंदिन कारभार चालविण्यासाठी महावितरणसमोर थकीत विजबिलाची वसूली हा एकमेव पर्याय आहे. सन्माननिय वीज ग्राहकांनी ही बाब लक्षात घेवून वीज बिले भरणा करावीत, असे विनम- आवाहन आहे.
वीजग्राहकांना महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्रावर वीज बिले भरण्याची सोय आहे. घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने महावितरण मोबाईल अॅप किंवा ुुु.ारहरवळीलेा.ळप या अधिकृत संकेस्थळावर वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. घरगुती, वाणिज्य, औद्योगिक या लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांचे वीजबिल 10 हजार रूपयांपेक्षा अधिक असल्यास आरटीजिएस एनईएफटीद्वारे वीज बिल भरण्याकरीता वीजबिलावर महावितरण बँक खात्याचा तपशील दिलेला आहे.