जरगनगरातील वीज कर्मचार्यांनी केला वीजपुरवठा सुरळीत
कोल्हापूर,
सध्या राज्यात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. काल गुरूवार दि.07 ऑक्टोबर 2021 रोजी महावितरणच्या रामानंदनगर उपकेंद्राच्या 11 के व्ही संभाजीनगर वीज वाहिनीत अचानक बिघाड झाल्याने जरगनगर, मंगळवार पेठ व टिंबर मार्केट भागातील वीज ग्राहकांचा वीज पुरवठा बाधित झाला. कोल्हापुरात उत्साहात साजरा केल्या जाणार्या नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस असल्याने वीज पुरवठा तातडीने सुरळीत करणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन जरगनगर शाखेतील वीज कर्मचार्यांनी वादळ, पाऊस व विजेचा कडकडाट असतानाही आपले काम चोखपणे पार पाडून तांत्रिक बिघाड दुरुस्त करीत वीज पुरवठा सुरळीत केला.
रामानंद उपकेंद्रातून निघणारी शाखा कार्यालय जरगनगर, मंगळवारपेठ व टिंबर मार्केट अंतर्गत येणार्या ग्राहकांना वीज पुरवठा करणारी 11 के.व्ही. संभाजीनगर वाहिनीत अचानक बिघाड झाल्याने वीजपुरवठा बाधित झाला. जरगनगर शाखेचे जनमित्र श्री.सचिन बावचकर, श्री.रोहित तोडकर व बाह्य स्त्रोत कर्मचारी श्री.अभिषेक कित्तूर यांनी नादुरुस्त वाहिनीचे बिघाड शोधण्याची मोहिम हाती घेतली. रामानंदनगर येथील ओढ्यामध्ये असणार्या वीज खांबावर जंप तुटल्याचे समजून आले. ओढ्यातून वाहणारे पाणी, कडकडणार्या वीजामुळे तारांना येणारे इंडक्शन कामाला अडथळा ठरत होते. तरीही महावितरणच्या कर्मचार्यांनी जोखीम पत्करून अवघ्या अर्ध्या तासात त्या भागातील वीज पुरवठा सुरळीत केला. या कामी सहाय्यक अभियंता श्री.अश्विनकुमार वागळे यांचे मार्गदर्शन लाभले. तातडीने वीज पुरवठा सुरळीत केल्याबद्दल त्या भागातील नागरिक व ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.