खिर्डीच्या लहान मुलांकडून मैत्रीदिन साजरा

खिर्डी प्रतिनिधी:-दि.१

मैत्रीचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असल्याचं सांगण्यात येतंय. अनेकांना त्याचा पदोपदी प्रत्ययही येतो. त्यामुळे ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना तोडेंगे’ अशीच भावना अनेकांची असते. याच मैत्रीच्या नात्याचा सन्मान करण्यासाठी आज जगभरात ‘फ्रेन्डशीप डे’ अर्थात मैत्री दिन साजरा करण्यात येत आहे.सर्वच वयोगटातील लोकांना, खासकरुन युवकांना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारची जास्त आतुरता असते. कारण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेन्डशीप डे’ साजरा करण्यात येतो. या दिवशी अनेकजण एकमेकांना फ्रेन्डशीप बॅन्ड बांधतात आणि आपली मैत्री अधिक घट्ट करतात तसाच मैत्रीदिन
खिर्डी येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरातील लहान मुलांनी झाडाला फ्रेंडशिप बँड बांधून आगळावेगळा मैत्रीदिन साजरा करण्यात आला .त्याप्रसंगी प्रमोद महाजन,विनोद सुतार,हेमंत भिरुड,चेतन खाचणे,खगेश महाजन लावण्य खाचणे, आरव महाजन,सृष्टी महाजन,अर्पिता सुतार हे उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!