अखिल भारतीय मराठा महासंघाच्या तालुका संघटक पदी प्रमोद कोंडे यांची नियुक्ती..
खिर्डी प्रतिनिधी – ( प्रविण शेलोडे )
कृषी तंत्रज्ञान महाविद्यालय वडगांव रोड निंभोरा बु. ता.रावेर. येथे दि.31/10/2021 रोज रविवार सकाळी 11. वाजता अखिल भारतीय मराठा महासंघ रावेर तालुका यांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी नियुक्ती व अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला ,या कार्यक्रमाचे अध्यक्ष रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळाचे विद्यमान संचालक संतोषराव महाजन, तर प्रमुख पाहुणे म्हणून
प्रा.दिव्यांक सावंत माजी जिल्हा संपर्कप्रमुख,अखिल भारतीय मराठा महासंघ, जळगांव जिल्हा अतुल सोनवणे उपजिल्हाध्यक्ष,अ.भा.मराठा महासंघ, ऍडव्होकेट धनराज पाटील रावेर, ऍड. देवकांत पाटील,यावल, प्रमोद कोंडे माजी पंचायत समिती सदस्य रावेर, विक्की पाटील यावल तालुका अध्यक्ष, माजी प्र. सरपंच निंभोरा सुभाष पाटील महाराज , शिवसेना कार्यकर्ता माजी सरपंच छोटू पाटील रेंभोटा, वडगाव सरपंच धनराज पाटील, मुंजलवाडी सरपंच योगेश पाटील, गौरखेडा ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील, स्वप्नील गिरडे, कृषी भूषण ज्ञानेश्वर पाटील गहूखेडा, उदयोजक कैलास येवले सर, सुनिल राऊत कोचूर, जळगांव जिल्हा दिपक राज पाटील सावदा जिल्हा सरचिटणीस,अ.भा. मराठा महासंघ,जळगांव जिल्हा प्रल्हाद पाटील युवक जिल्हा उपाध्यक्ष,अ.भा.मराठा महासंघ जळगांव जिल्हा यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती, व यांच्या शुभहस्ते अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी, कार्यकर्ते, यांना विलास ताठे तालुकाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ रावेर यांचे सहीचे नियुक्ती प्रमाणपत्रे देण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, या कार्यक्रमात सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून , भारताचे माजी उपपंतप्रधान लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करून प्रतिमा पुजन करून पुष्पहार सर्व मान्यवरांनी घातले , तसेच भारताचे माजी पंतप्रधान आर्यन लेडी स्व. इंदिरा गांधी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास ताठे यांनी करून दिव्यंग सावंत, दिपक राज पाटील, ऍड. धनराज पाटील, ऍड. देवकांत पाटील, शिवसेना कार्यकर्ता, माजी सरपंच छोटू पाटील, प्र. सरपंच ह.भ.प. सुभाष महाराज, यांनी मनोगत व्यक्त केले . यात प्रामुख्याने मराठ्यांसाठी आचार संहिता, पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले, त्यांचे वाचन करून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई अंतर्गत योजना, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे, राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता याविषयीची सविस्तर माहिती देवून रावेर तालुक्यातील अनेक खेड्यात पाड्यातील तरुणांना स्फूर्तीदायी , प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.त्यानंतर पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आली, अखिल भारतीय मराठा महासंघ रावेर तालुका, संघटक म्हणून मा.पंचायत समिती सदस्य प्रमोद कोंडे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी कार्यक्रमासाठी रावेर तालुका अध्यक्ष विलास ताठे, जिजाबराव महाजन ,किरण पाटील, गौरव महाजन,जयेश पाटील,अक्षय सोनवणे, महेंद्र पाटील, मयूर महाजन, प्रल्हाद पाटील, भैय्या पाटील वाघाडी, निखिल चौधरी, प्रशांत काठोके, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील गिरडे,पत्रकार योगेश पाटील, अमोल गिरडे, निवृत्ती चौधरी, सुनिल पाटील, मिलन कोंडे, जयेश शाहापुरे, शुभम कराड, ललित महाजन, अनिल महाजन, यांनी परिश्रम घेतले तर आभार अक्षय सोनवणे यांनी मानले. मोठ्या संख्येने मराठा तरुणांची उपस्थिती ही लक्षणीय अभिमानास्पद बाब या कार्यक्रमात निदर्शनास आली.