खिर्डी येथे अवैध देशी,गावठी दारूची खुलेआम विक्री.स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष.!

खिर्डी प्रतिनिधी:- ( प्रवीण शेलोडे )

खिर्डी येथे बस स्टँड परिसरात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत खुलेआम देशी व गावठी हातभट्टीची दारू विक्री केली जाते.या मध्ये कामगारवर्ग व नवयुवकांना दारूचे व्यसन लागल्यामुळे आजची ही युवा पिढी बरबाद होत आहे.तसेच देशी व गावठी दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून 25 ते 30 वयोगटातील महिला या विधवा झाल्या आहेत तर लहान मुले ही वडिलांच्या प्रेमाला मुकलेली आहेत.तसेच महिला वर्ग दिवसभर शेतात काबाड कष्ट करून आपल्या घरसंसाराला आर्थिक मदत करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना दिसतात.मात्र महिलांना मारहाण करून त्यांना मिळालेले मजुरीचे सर्व पैसे हे दारू पिण्यात जात असतात.मात्र परिस्थिती याउलट होते मूलबाळ उपाशी आणि तळीराम मात्र तुपाशी असे चित्र दिसत आहे. तसेच काही मुलींना बाप दारुड्या असल्यामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागले असून त्या मुली सध्या आपल्या आई सोबत शेतात कामाला जातात किंवा केळीचे घड वाहण्यास जातात हे वास्तव चित्र खिर्डी येथे दिसत आहे. दारूचे व्यसन असल्याने मिळालेला सर्व पैसा दारू पिण्यात जातो.दारू विक्रिला ग्राहकी चांगली असल्यामुळे तसेच आर्थिक उत्पन्नही मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे अनेक व्यक्‍तींनी या व्यवसायात उडी घेतली आहे. तसेच काही तळीराम दारू पिऊन सार्वजिनक ठिकाणी गोंधळ घालतात तर काही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणार्‍या महिला,विद्यार्थी व वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.मात्र तक्रार देण्यास कुणी पुढे येत नसल्यामुळे मद्यपींचा त्रास वाढला आहे.तसेच ग्रा.पं प्रशासन व दारूबंदी कमेटी पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने गावातून अवैध देशी, गावठी दारू विक्री बंद होईल का? अशी संतप्त प्रतिक्रिया सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहे.

____________________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर तालुक्यातील बातमी 7887987888 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
प्रदीप महाराज
रावेर तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-7887987888

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!