खिर्डी खु ग्रामपंचायत स्वच्छतेकडे देईल का लक्ष? ग्रामस्थानकडून तक्रारी

खिर्डी प्रतिनिधी:- ( प्रवीण शेलोडे )

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे गावात डासांचा सुळसुळाट, तुंबलेल्या गटारी, बंद पथदिवे,तसेच इतर नागरी समस्यांनी कळस गाठला असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी वार्ड क्र.1चे ग्रामपंचायत सदस्य हे कुठलेही प्रयत्न करीत नसल्याने ग्रामस्थां मध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

तसेच
दुर्लक्षामुळे सध्या वार्ड क्र.1या भागात नागरी समस्या मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. स्वच्छता पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून या भागात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. तसेच तुंबलेल्या गटारी,बहुतेक भागातील रस्त्यांवरील खड्डय़ात साचलेले पाणी तसेच पावसामुळे सखल भागात निर्माण झालेली पाण्याची डबकी यामुळे या परिसरात डासांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे.तसेच गटारींची व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी, टाकी जवळ साचत असून या भागातील ग्रामस्थ खूपच त्रस्त झाले असून संबंधित प्रभागातील ग्रा.पं सदस्य यांना वारंवार याबाबत माहिती देवूनही त्यांच्याकडून मात्र काहीच प्रतिसाद मिळत नाही.

या भागात बंद असलेले पथदिवे ही एक प्रमुख समस्या ग्रामस्थांना भेडसावत आहे.ग्राम पंचायत प्रशासनाला नेहमी बंद असलेले पथदिवे बदलण्याची मात्र आवश्यकता वाटत नाही. पथदिवे बंद असल्याने या भागात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. अनेक वेळा मागणी करूनही बंद दिवे बदलण्यात येत नाहीत, हे विशेष. मात्र वार्ड क्र.1चे सदस्य यांचे कडे एखादी समस्या घेऊन ग्रामस्थ जातात तर त्यांना तेवढय़ापुरते एखाद्या कर्मचाऱ्याला फोन करून सांगतो मात्र समस्या सुटत नसल्याचा प्रकार सध्या पाहवयास मिळत आहे.वार्ड क्र.1चे ग्राम पंचायत सदस्य यांनी निवडणूक काळात ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला का ?..

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर तालुक्यातील बातमी 7887987888 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
प्रदीप महाराज
रावेर तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-7887987888

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!