खिर्डी खु येथे पिक पेरा नोंदीचे प्रशिक्षण संपन्न…

खिर्डी प्रतिनिधी:- ( प्रविण शेलोडे -मो.नं.9730402142 )

मीच नोंदवणार माझा पिकपेरा व
बांधावरूनच शेतकरी करणार आता पीक पाहणी या शासनाच्या योजनेनुसार नुकतेच खिर्डी खु येथे इ पिक पाहणी प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला .
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील 30 जुलै 2021 च्या शासन निर्णयानुसार या महसुली वर्ष सन-2021/2022 पासून आता इ पीक पाहणीला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्हासाठी इ पीक पाहणी मोबाईल अॅप मधून पीक पाहणी भरण्यासाठी 15 ऑगस्ट नंतर उपलब्ध होणार आहे .शेतकरी खातेदारांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी खिर्दीखु येथे मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी भरणे व ते अॅप डाउनलोड करून घेणेचे प्रक्षिक्षण गावातील उत्साही शेतकरी खातेदारांना देण्यात आले .यासाठी शेतकरी खातेदारांना प्रत्यक्ष अॅप चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी शेतकरी खातेदारांनी स्वतः पीक पाहणी अॅपवर भरून घेतली. त्यानंतर 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यन्त सर्व शेतकरी खातेदारांनी आपला पिकपेरा अॅप च्या सहाय्याने भरून आपली पीकपाहणी अद्यावत करावी. असे आवाहन करण्यात आले.
सदर कार्यक्रम रावेर तहसिलदार यांच्या आदेशाने घेण्यात आला .
यावेळी खिर्डी तलाठी खान साहेब कोतवाल अनंता कोळी व शेतकरी प्रभाकर महाजन ,सुरेश पाटील ,किशोर पाटील , पोपट चौधरी ,तुळशीराम कोळी ,सुभाष महाजन व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!