पं.स.सदस्य दिपक पाटील यांच्या प्रयत्नातून वाघाडी,खिर्डी,निंभोरा गावात लाखो रुपयांचा विकासकामासाठी निधी..!

खिर्डी प्रतिनिधी:- प्रवीण शेलोडे

निंभोरा गणात विकासाचा ध्यास वा नेहमी विकासकामासाठी प्रयन्तशील तसेच युवा वर्गात अधिक लोकप्रिय असलेले पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादी कांग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.दिपकभाऊ पाटील यांच्या अथक प्रयत्नातून पं. समिती स्तरावर निधी उपलब्ध नसतांना सुद्धा दिपक पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावरून निधी उपलब्ध करून आणला असून निधी लोक कल्याणाच्या कामासाठी खर्च करण्यात येत असून त्यात प्रामुख्याने वाघाडी, खिर्डी, निंभोरा या गावात पेव्हर ब्लॉक बसविणे, काँक्रिटिकरण करणे अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाट्न जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा सौ. रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल ता. अध्यक्ष सुनील कोंडे यांनी केले.याप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष श्री.रवींद्र नाना पाटील, किसान सेल चे जिल्हा अध्यक्ष सोपान पाटील,माजी जी.प.सदस्य रमेश पाटील,रा.काँग्रेस चे ता.अध्यक्ष नीलकंठ चौधरी, रा.काँग्रेस महिला आघाडी ता.अध्यक्ष सौ. मायाताई बारी, रा.युवक ता. अध्यक्ष सचिन पाटील, रा.काँग्रेस ता. सरचिटणीस वाय.डी. पाटील, रावेर शहर अध्यक्ष मेहमूद भाई,युवक जिल्हा उपाध्यक्ष कुणाल महाले, यु.शहर अध्यक्ष प्रणित महाजन,मयूर पाटील,वाघाडी उपसरपंच राजेंद्र महाजन, निंभोरा येथील सरपंच सचिन महाले, खिर्डी लोकनियुक्त सरपंच गफूर कोळी, ज्ञानेश्वर पाटील, किरण नेमाडे, ग्रा.पं.सदस्य पंकज राणे, गंभीर पाटील,ग्रा.रो.सेवक खिर्डी उमेश तायडे,सर्व जेष्ठ नागरिक,महिलांवर्ग सर्व ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी व सर्व युवा सहकारी उपस्थित होते. यावेळी आभार रा.यु. ता.सरचिटणीस गणेश देवगिरकर यांनी मानले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!