वंचित बहुजन आघाडी नगरपालिका ,जि.प. व पं.स निवडणुका स्वबळावर लढविणार

खानापूर (प्रतिनिधी) –

रावेर येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाची महत्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे यांच्या अध्यक्ष खाली संपन्न झाली.ही बैठक नवीन तहसील कार्यालय जवळील नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स वरच्या मजल्यावर आज .दि, 22/10/21 रोज शुक्रवार दुपारी 2.30 वाजता संपन्न झाली.* या बैठकीला जिल्हा महासचिव दिनेश भाऊ ईखारे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग व तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे यांनी मार्गदर्शन केले.येणाऱ्या नगर पालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भात विचार विनिमय व पक्ष बांधणीसाठी गावोगावी बैठका घेण्यासाठी सदर बैठकीचे नियोजन करण्यासाठी आयोजित केली असून सर्व वंचित बहुजन आघाडीचे तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी ग्राम शाखा, पदाधिकारी यांना सुचना दिल्या की, येणाऱ्या नगर पालिका , जि.प. व पं.स. च्या मोर्चे बांधणीसाठी कामाला लागा. अशा कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सुचना देण्यात आल्या.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका उपाध्यक्ष सुरेश अटकाळे, राजेंद्र अवसरमल,दौलत अढांगळे,
जलील शेख, भुसावळ शहराध्यक्ष देवदत्त मकासरे,कंदरसिंग बारेला, भिमसिंग बारेला, सुरेश बारेला, कालु बारेला, चंद्रसिंग बारेला, तुषार कापसे संदिप सवर्णे, सैय्यद
युनुस सैय्यद अजहर , गौतम अटकाळे, तसेच सावदा येथील मुस्लीम समाजातील बहुसंख्ये कार्यकत्यानी वंचित बहुजन पक्षात प्रवेश केला.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका सरचिटणीस कांतीलाल गाढे यांनी केले.तर आभार राजेंद्र अवसरमल यांनी मानले .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!