ग्रामीण भागात औषधांचा तुटवडा
खानापूर प्रतिनिधी (उमाकांत मराठे)
रावेर वाघोडा खानापूर येथील ग्रामीण रुग्णालयात मागील अनेक दिवसापासून औषधींचा तुटवाडा निर्माण झाला असून औषधी मिळत नसल्याने रुग्णांना बाजारातून औषधी खरेदी करावी लागत आहेत. अनेक रुग्ण ग्रामीण रुग्णालयात न येता खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने प्रचंड आर्थिक ताण अशा कुटुंबावर पडत आहे.रावेर तालुक्यातील खाजगी रुग्णालयात गर्दी : रावेर तालुक्यात ग्रामपंचायतीदरम्यान गावांची संख्या जास्त असून देखील आरोग्याच्या दृष्टीने शहरात ग्रामीण रुग्णालय सरसम वाघोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे़ सध्या पावसाळा सुरु असल्याने विहीर, बोरमध्ये नवीन पाणी जमा झाले़ त्यामुळे क्षाराचे प्रमाण वाढले़ त्यामुळे लहान मुलापासून मोठ्या नागरिकांत ताप, सर्दी, खोकला आदी रोग्यांचे प्रमाण वाढले असल्याने सरकारी, खाजगी दवाखान्यात गर्दी दिसून येत आहे़ खानापूर येथील उप ग्रामीण रुग्णालयात नागरिकांचे सर्दी, ताप, खोकला तर लहान मुलांचे सर्दी, ताप, खोकल्यावरील कोणत्याच प्रकारचे औषध उपलब्ध नसल्याने पालक वर्ग व नातेवाईक दवाखान्यात रोजच वाद घालत आहेत. डॉक्टरची टीम उपस्थित असूनही अनेक प्रकारचे औषधी गेली काही दिवसांपासून नसल्याने हतबल झाले़ आहे परंतु तरीसुद्धा याच्यावर कुठली दखल घेतली गेली नाही परंतु उपचारासाठी गेलेल्या विनायक पाटील खानापूर यांना उपचारादरम्यान कुठलीही औषध न मिळाल्याने त्यांनी आमच्या दैनिक महाराष्ट्र सारथी प्रतिनिधी उमाकांत मराठे खानापूर यांना सविस्तर माहिती दिली त्या माहितीचा पुर्ण आढावा घेण्यासाठी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात रावेर येथे गेले व मेडिकल कर्मचारी यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांचें म्हणणें होतें की ग्रामीण भागात आरोग्य केंद्र आहे त्यांना सुद्धा औषधे रावेर ग्रामीण रुग्णालयच पुरविते जा मुळें पण जिल्हा रुग्णालयात सुद्धा औषधे साठा कमी आहे त्या मुळे काही रुग्णांना औषधांचा तुटवडा निर्माण झाला पण आम्ही मात्र दोन तीन दिवसात औषधे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.