भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटलांकडून खानापूरचे निंभोरे कुटुंबियांचे सांत्वन….
खानापूर प्रतिनिधी :- ( उमाकांत मराठे )
नारायण सुपडू निंभोरे यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने त्यांच्या वर दुःखाचे डोंगर कोसळल्याने त्यांच्या द्वार दर्शनासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उप अध्यक्ष प्रल्हाद भाऊ पाटील यांनी निंभोरे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होऊन भेट दिली प्रल्हाद भाऊ पाटील भारतीय जनता जिल्हा उपाध्यक्ष हे गावात आले आहे असे कळताच गावातील नागरिक व कार्यकर्ते लगेच एकत्र जमले व खानापूर गावातील समस्या विकासकामांबद्दल चर्चा केली हे सर्व पाहता प्रल्हाद पाटील यांनी गावातील समस्या विकास कामे पूर्ण होतील असे आश्वासन दिले,या प्रसंगी योगेश्वर एकनाथ महाजन ,गोकुळ भास्कर पाटील,रघुनाथ सुखदेव चौधरी
लीलाधर सुभाष चौधरी,पत्रकार उमाकांत मराठे,माधव विठ्ठल चौधरी
अजयसिंग राजपूत,सुनील सुरेश पाटील,बरीच मंडळी उपस्थित होते.