प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर- प्रशांत बोरकर यांच्या पाठपुराव्याला यश
खानापूर प्रतिनिधी (उमाकांत मराठे )
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र यांना पाठविलेल्या पत्रात रावेर शह प्रत्येक जिल्हा मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ची मागणी केली होती त्यासदर्भात मुख्यमंत्री महोदय यांनी वेद्यकिय शिक्षण मंत्रालय कडे प्रकरण पाठविले होते त्यावर वेधकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी त्याबाबत आज प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणी चे दृष्टीकोनातून नियोजन करण्याचं आदेश केले आहे. त्याचे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र यांना धन्यवाद व्यक्त केले होते आज वेधकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांचे पण स्वागत करून सदरहू मेडिकल कॉलेज हे रावेर येथेच झाले पाहिजे.
रावेर येथे आरोग्य सेवा उपलब्ध करून लोकांचे प्राण वाचण्यासाठी त्याबरोबर उपजिल्हा रुग्णालय पण झाले पाहिजे एका याचिकेत शासन याचे अधिकारी यांनी आरोग्य सुविधा ऊपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते तसेच शासनाने 2016 मद्ये प्रतेक जिल्हा मद्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणी करण्याचे धोरण घेतले होते तेव्हा पासून श्री प्रशांत बोरकर यांनी शेकडो वेळा पत्र परिपत्रक पाठवून हे कॉलेज रावेर येथेच झाले पाहिजे अशी मागणी लावून धरली आहे.