अतिवृष्टी अवकाळी पावसाने झाले नुकसान शेतकऱ्यांच्या दिवाळीवर पावसाचे विरजन..
अतिवृष्टी पावसामुळे ज्वारी कपाशी मका पिक धोक्यात
खानापूर प्रतिनिधी – ( उमाकांत मराठे )
वरुणराजाच्या मेहरबानीवर पीक घेणारा बळीराजा यंदा त्याच्या लहरीपणामुळे अगतिक झाला आहे जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खानापूर गावातील शेतकऱ्यांची अवस्था अर्त करणारी आहे मागील वर्षाचा दुष्काळानंतर यावर्षीही दिवाळी थाटामाटात चांगली होईल या आशेने राबणाऱ्या शेतकऱ्याच्या दिवाळीवर पावसाचे विरजण पडल्याचे चित्र दिसत आहे जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खानापूर परिसरातील अतिवृष्टी मुळे पावसामुळे शेतातील ज्वारी कपाशी मका पिक पिवळी पडली आहे तर अधिक दिवस पाणी साठलेल्या ठिकाणी पिके सडू लागली आहेत ज्यामुळे शेतकरी राजाची चिंता वाढली आहे की पिक आता हातातून जाते की काय शेतकऱ्यांपुढे कायम अडचणी निर्माण होतात शेतकऱ्यांनी घेतलेली महागडे बियाणे आणि त्यांतच त्यांची उगवण क्षमता कमी आणि त्यांतच वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने ज्वारी कपाशी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान शेतकऱ्याचे नुकसान झाल्यामुळे सरकार काही मदत करेल का शेतकरी राजा या प्रतीक्षेत….