उल्हास नदीच्या पाण्यावर लालसर तंवग, पाणी प्रदूषणाच्या भितीने खळबळ,जिवनवाहिनी धोक्यात?

कल्याण प्रतिनिधी – ( संजय कांबळे mob.- 9561779905 )

कल्याण तालुक्याची जिवनवाहिनी ठरलेल्या उल्हास नदीच्या पाण्यावर लालसर तंवग निर्माण झाल्याने हे पाणी प्रदूषित झाले की काय?अशी भिती निर्माण झाली असून तालुक्याची ही जिवनवाहिनी धोक्यात आली आहे, असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे.

कल्याण तालुक्यात उल्हास, काळू,भातसा आणि बारवी अशा चार बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत,यातील भातसा, काळू बारवी या नदयावर काही ग्रामपंचायती पाण्यासाठी अवलंबून आहेत तर उल्हास नदीवर शासनाची रायते प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे,या योजनेवर १५/२०गावे तसेच अनेक वाड्या वसत्या पाणी भरतात. ऐवढेच नव्हे तर, कल्याण डोंबिवली पालिका, उल्हास नगर, अशी शहरे देखील अवलंबून आहेत. म्हारळ, वरप कांबा अश्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीसह रायते,मानिवली, आपटी मांजर्ली, आणे भिसोळ,अशी छोटी मोठी गावेहीअसे अडीच ते तीन लाख लोक पिण्यासाठी पाणी वापरतात. तसेच अनेक शेतकरी याच पाण्यावर भाजीपाला पिके घेऊन कुंटूबाचा उदरनिर्वाह करतात , त्यामुळे उल्हास  नदीस तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते.

परंतु दिवसेंदिवस ही जीवनवाहिनी धोक्यात येऊ लागली आहे, नदीच्या काठावर उभे राहणारे फार्महाऊस,तबेले,धाबे,यातून सोडले जाणारे डेंनिजचे पाणी, गटारे,विविध कंपन्या चे केमिकल्स युक्त पाणी, नदीत टाकणारे निर्माल्य,धोबीघाट नाला,वाघेरापाडा नाला,अंबरनाथ, बदलापूर मोहना येथील सांडपाणी, ‘आवाज’टाकून’होणारी मासेमारी या सर्वाचा परिणाम म्हणून नदीचे पाणी दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे.

मागील काही वर्षापासून उल्हास नदी बचाव कृती समिती तसेच वरप येथील सेक्रेट हार्ट स्कुल चे विद्यार्थी या बाबतीत जनजागृती व नदी स्वच्छतेचे काम करीत आहेत. शाळेचे व्यवस्थापक अलबिंन अथोंनीसर हे स्वतः यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन काम करत असतात. या सर्वाचा परिणाम म्हणून आज नदीमध्ये ‘केंजाळ’ही वनस्पती दिसत नाही. एक काळ असा होता,संपूर्ण नदी ही या वनस्पतींनी व्यापली होती. कुत्रा पशुपक्षी यावरून इकडेतिकडे येजा करत होते. मासे व इतर जलचर मोठ्या प्रमाणात मृत्यू पडत होते.

आता पुन्हा गेल्या २/३दिवसापासून या पाण्यावर लालसर तंवग पसरला आहे, अगदी आणेभिसोळ,ते रायते पुल,पाचवामैल,पावशेपाडा, मोहिली पूल,कांबा, शहाड राँ वाटरपंप,मोहना बंदारा इथपर्यंत हा तंवग पसरला आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शंकर वाघमारे – वरीष्ठ अधिकारी —

(महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण)-या संदर्भात आमचे अधिकारी संबंधित ठिकाणी नदीवर पोहचून पाहणी करत आहेत.)

रघूनाध गायकर – अध्यक्ष, पोलीस पाटील संघटना, कल्याण तालुका. —

-अगोदर कोरोनाच्या आजाराने लोक बेजार झाली होते. अशातच पाणी जर दूषित झाले तर अवघड होईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!