संत निरंकारी संत्सग भवन कांबा येथे कोविड लसीकरण मोहीम संपन्न..

कल्याण प्रतिनिधी – ( संजय कांबळे mob.- 95617 79905 )

कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या संत निरंकारी भवन येथे कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निरंकारी मिशनच्या सेविका व सेवक यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे लसीकरण सुरळीतपणे पार पडले.

सध्या कल्याण तालुक्यातील दहागाव,खडवली निळजे या प्राथमिक आरोग्य केंद्रासह गोवेली ग्रामीण रुग्णालय,वरप कोविड केअर सेंटर प्रिती अँकेडमी शाळा म्हारळ, उपकेंद्र गोवेली, गुरवली, राया, आदी ठिकाणी कोविड लसीकरण मोहीम सुरू आहे. तसेच काही ग्रामपंचायत कार्यालयात ही अशी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तालुक्यातील निम्या लोकसंख्येचे लसीकरण झाले असले तरी अद्यापही ग्रामीण भागातील अनेक नांगररीक या लसीकरणापासून वंचित राहिले आहेत.

त्यामुळे दहागाव गटाच्या झेडपी सदस्यां जयश्री सासे यांच्या पुढाकाराने कांबा ग्रामपंचायत हद्दीतील संत निरंकारी  संत्सग भवन येथे आज सर्व पित्री अमावास्या दिवशी कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झेडपी सदस्या जयश्री सासे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ,कांबा ग्रामपंचायत सदस्य दत्ता भोईर, अरुण शिरोसे,पद्माकर शिरोसे,भगवान शिरोसे,संत निरँकारी मिशनचे  मुख्य प्रंबधक आंनद भोईर,उत्तम शिरोशे,कांचन घन्शानी, कांच़न कुनावे,सविता बनकरी, कांबा ग्रामपंचायतीचे लिपिक गुरुनाथ बनकरी, पत्रकार संजय कांबळे,एम पी डब्ल्यू कैलास तालीकोटे,आदींचे मिशन तर्फे स्वागत सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उत्कृष्ट निवेदक ,हिरामन खरकर युवा शाखाप्रमुख कांबा यांनी केले.

संत निरंकारी मिशनच्या वतीने राबविण्यात आलेले हे कोविड लसीकरण कल्याण तालुक्यात कांबा गावात पहिल्यांदा च होत असल्याचे उत्तम शिरोसे यांनी सांगितले तर मिशनच्या सेविका व सेवक यांच्या निटनेटके उत्कृष्ट नियोजन, योग्य समन्वय आणि चांगल्या जनसंपर्कामुळे अंत्यत सुरळीतपणे कोणताहि गडबड गोंधळ न होता लसीकरण पार पडले. लसीकरणानंतर घेतली जाणारी काळजी यामुळे येणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दुपारपर्यंत सुमारे१५०ते२००नागरिकांना लसीकरण करण्यात आले असे मिशनच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी कांबा ग्रामपंचायतीने देखील या लसीकरणास सहकार्य केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!