ठिकेकरवाडी ग्रामपंचायतीला ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान….

जुन्नर प्रतिनिधी – ( मनोहर हिंगणे )

जुन्नर तालुक्यातील आदर्श गाव ठिकेकरवाडी या ग्रामपंचायतीला ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली विज्ञान भवन येथे प्रदान करण्यात आला. सदरचा पुरस्कार ग्रामपंचायत ठिकेकर वाडी गावचे सरपंच संतोष ठिकेकर, जुन्नर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, ग्रामसेवक अस्लम हुसेन शेख यांनी हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. ग्रामपंचायतीने सोलर पॅनल, पवनचक्की, बॉयोगॅसच्या माध्यमातून १५ हजार वॅट विद्युत निर्मित केली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी ग्रामपंचायतीचा गौरव झाला.
ग्रामपंचायतींमध्ये सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील पाच ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये जुन्नर तालुक्यातील ठिकेकरवाडी ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाच्यावतीने १७ ते २१ एप्रिलपर्यंत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह’
साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आज राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री गिरिराज सिंह, केंद्रीय ग्रामीण
विकास राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते, केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील, विभागाचे सचिव सुनील कुमार व्यासपीठावर उपस्थित होते. ग्रामपंचायत ठिकेकरवाडीचे व सरपंच, ग्रामसेवक यांचे जुन्नर तालुक्यातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!