विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृती 12 ऑगस्टपयर्ंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
जालना प्रतिनिधी
27 जुलै
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात मातंग समाज व सत्सम 12 पोटजातील विद्यार्थी विद्यार्थींनी याना 10 वी 12 वी , पदवी, पदव्युत्तर, वैद्यकिय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणार्या जिल्हातील प्रथम 03 ते 05 विद्यार्थ्यांस गुणाणुक्रमे निधीच्या उपलब्ध नुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. तरी विद्यार्थी, विद्यार्थींनी सोबत अर्जदाराचा जातीचा दाखला ( सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेूला असावा ), अर्जदाराच्या कुटूंबाच्या उत्पन्नाचा दाखला ( तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा ), रेशन कार्ड, आधार कार्ड, झेरॉक्स प्रत, गुणपत्रक, दोन पासपोर्ट साईज फोटो, बोनाफाईट , पुढील वर्षात प्रवेश घेतल्याचे पुरावा असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मया) डॉ.बाबासाहेब आंबडेकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे दि.12 ऑगस्ट 2021 पयर्ंत अर्ज सादर करावे, असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जालना यांनी कळविले आहे.