प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021

जालना प्रतिनिधी

27 जुलै

खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यामध्ये रिलायंस जनरल इन्शुरंस कंपनी लि.मार्फत राबविली जात आहे. पंतप्रधान पिक विमा योजनेत मुग,उडीद,सोयाबीन,बाजरी,मका,तूर व कापूस या पिकांचा विमा संरक्षण घेतलेल्या शेतकर्‍यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती (ङेलरश्रळूशव उरश्रराळींळशी) या जोखिमेच्या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी,पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून ,शेत दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे , या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते.जालना जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. ज्या शेतकर्‍यांनी पिक विमा घेतलेला आहे व ज्यांचे वरील कारणामुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकर्‍यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमे अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकर्‍यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पिक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंन्स अ‍ॅप (उीेि खर्पीीीरपलश अिि)  संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक  बँक  कृषि व महसूल विभाग नुकसान पूर्वसूचना कळविण्यात यावी.सदर नुकसान कळविताना अचूक सर्व्हे नं,पिकाचे नाव व विमा पावती व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक असेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!