वंचितांच्या पदाधिकार्यांनी पिंपळवाडी येथील थेट शेतकर्यांच्या बांधावर जाऊन घेतली भेट
जालना प्रतिनिधी
20 जुलै
तालुक्यातील पिंपळवाडी शिवारातील गट क्रमांक 9599 मधिल शेतकर्यांची शेतातील रस्त्याची समस्या निर्माण झाली असल्यामुळे शिवारातील 20 शेतकर्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत.
जालना तहसील कार्यालया कडून अद्याप या शेतातील रस्त्याची सोडवणुक न झाल्याने सदरिल शेतकरी मेटाकुटीला आले आहेत या शेतकर्यांची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके व पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी थेट शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शेतकर्यांची भेट घेतली व सामंजस्याने शेतातील रस्त्याचा तोडगा काढण्यासाठी विनंती केली असता शासकीय नियमानुसार रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचे सर्वच शेतकर्यांनी मान्य केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, जिल्हा उपाध्यक्ष विष्णु खरात, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष प्रमेश्वर खरात, भगवान मघाडे, विकास तुरेराव, प्रसाद सदावर्ते,दत्ता खाडे, उध्दव खाडे व ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.