नदी व जन्मदाते कधीच जूने होत नसतात – महंत बा . भो . शास्त्री डॉ शिवाजी हुसे रचित

जालना प्रतिनिधी

20 जुलै

मानवी जीवनात नद्यांचे महत्व अनन्य साधारण असून नदीमुळे संस्कृती , समाज आणि मूल्य कायम प्रवाही राहिले आहे . काळ कोणता ही असो नदीला वगळून मानवी जीवन पूर्ण होऊ शकत नाही . नदी काठीच मानवी वस्ती व पर्यायाने संस्कृती टिकून राहिली . अनेक वस्तू कालांतराने जुन्या होतात . मात्र नदी आणि माय-बाप कधी च जूने होत नाहीत. असे प्रतिपादन चिंतनी जनक महंत बा . भो . शास्त्री यांनी केले.

देशगव्हाण ता. अंबड येथे सुखना बचाओ जन आंदोलन संघर्ष समिती च्या वतीने प्रा . डॉ. शिवाजी हुसे रचित ”सुखना मायची कहाणी ”या कविता संग्रहाचे प्रकाशन सुखना नदी तिरावर ब. भो. शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय भोसले हे होते . भाष्यकार डॉ. सर्जेराव जिगे, सुखना बचाओ जन आंदोलन संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोकराव काळे , सचिव व स्वागताध्यक्ष डॉ. बाळासाहेब बेळगे , उपाध्यक्ष भाऊसाहेब घुगे , कार्याध्यक्ष नगरसेवक शिवाजीराव दांडगे पाटील , सहसचिव सुरेश जुए पाटील , नाईकवाडे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

महंत बा . भो . शास्त्री यांनी आपल्या रसाळ वाणीने चिंतनशील मार्गदर्शन करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. भोसले यांनी जन आंदोलनाचे व कवी डॉ. हुसे यांचे अभिनंदन करून उपक्रमास शुभेच्छा देत सहकार्य करण्याची हमी दिली . काव्यसंग्रहावर भाष्य करतांना डॉ. सर्जेराव जिगे म्हणाले , सुखना मायची कहाणी या कविता संग्रहातून प्रा . हुसे यांनी सुखना नदीचे वर्तमान, विदारक स्थिती , त्यांच्या आठवणी, अनुभव आणि मानवी जीवन मूल्यांचे यथार्थ दर्शन घडवले असून नदी या दुर्लक्षीत विषयावर लेखन करून प्रश्नांची मुद्देसूद मांडणी केल्याने त्यांची कविता लक्षवेधी ठरेल. असा विश्वास डॉ. सर्जेराव जिगे यांनी व्यक्त केला.

प्रा .डॉ.शिवाजी हुसे यांनी काव्य लेखन व जन आंदोलनाची भूमिका नमूद केली .

प्रास्ताविकात डॉ. बाळासाहेब बेळगे यांनी प्रकाशन सोहळा व जन आंदोलनाची भूमिका विषद केली .

मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी टाकून शुभारंभ करण्यात आला .

यावेळी जन आंदोलनाचे चिन्ह व पञकाचे अनावरण करण्यात आले .

महंत बा.भो . शास्त्री , प्राचार्य डॉ. विजय भोसले , डॉ. सजॅराव जिगे यांना सुखना भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . वृक्ष व शाल श्रीफळ देऊन संघर्ष समिती चे पदाधिकारी व सरपंच , ग्रा.पं . सदस्य यांचा विशेष सत्कार करण्यात आला . सूत्रसंचालन डॉ . एकनाथ शिंदे यांनी केले तर प्रा . एकनाथ डोळे यांनी आभार मानले .

यावेळी कवी पांडुरग गिराम , सरपंच अनंतराव हुसे , संदीप हुसे ,प्रकाश जायभाये ,सर्जेराव वाघ ,शिवाजीराव कराड ,मुकुंद हुसे , महादेव हुसे , भाऊ साहेब कळमकर , जगन्नाथ हुसे , डिंगाबर हुसे , नारायण अवघड , बाबासाहेब पठाडे , महादेव बोंडारे , मयुरराज हुसे , संतोष कळमकर , चंदू नवपुते , भगवानराव हुसे , आदींची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!