टोकीयो ऑलिंम्पीक 2020 करिता निवड झालेल्या महाराष्ट्रातील व देशातील खेळाडूंना पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदालसह मान्यवरांनी दिल्याशुभेच्छा

जालना प्रतिनिधी

19 जुलै

सन 2020 मधील ऑलिम्पिक स्पर्धा हया जपान देशामध्ये टोकीयो या शहरामध्ये दि. 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत होत आहेत. टोकीयो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य व देशातून निवड झालेल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्याचे आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा परिषद, जालना डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनुज जिंदाल, जिल्हा क्रीडा अधिकारी जालना श्रीमती सुहासिनी देशमुख यांनी खेळाडू सेल्फी पॉईंटचे व खेळाडू बॅनरचे उद्धाटन करून शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्रातून श्रीमती राही सरनोबत (शुटींग 25 मी पिस्तूल), श्रीमती तेजस्विनी सावंत (शुटींग 50 मी थ-ी.पी.), प्रविण जाधव (आर्चरी रिकर्व्ह), अविनाश साबळे (अ‍ॅथलेटिक्स 3000 मी स्टिपलचेस), विराग शेट्टी (बॅडमिंटन दुहेरी-पुरूष), स्वरूप उन्हाळकर (पॅरा शुटींग 10 मी रायफल), विष्णु सरवानन (सेलिंग लेरार स्टॅडर्ड क्लास), उदयन माने (गोल्फ), सुयश जाधव (पॅरा जलतरण 50 मी बटर फलाय, 200 मी वैयक्तीक मिडले), श्रीमती भाग्यश्री जाधव (पॅरा अ‍ॅथलेटिक्स गोळाफेक) या 10 खेळाडूंची निवड झालेली आहे. त्यात अविनाश साबळे हा खेळाडू मराठवाडयातील बीड जिल्हयातील मांडवा ता. आष्टी या गावाचा आहे.

या प्रसंगी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आशा गरूड, उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जालना नागेश मापारी, बाळासाहेब खरात, जिल्हा परिषद सदस्य, बबनराव खरात आदींची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!