वंचितच्या आंदोलकांची बदनामी केल्याप्रकरणी दोषी पोलिसअधिकार्यांवर कारवाई करा-दिपक डोके
जालना,
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लॉक डाऊनच्या काळात महाराष्ट्रातील बंद असलेली बस सेवा पुर्वत चालू करा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार दिनांक 12 82020 रोजी जालना बस स्थानक येथे डफली बजाव आंदोलन करण्यात आले होते.या पार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलक पदाधिकारी यांच्या वर सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक गुन्हे दाखल असल्याने या गुन्ह्यांत जामीन घेतलेला असतांना देखील केवळ वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बदनामी करण्याच्या हेतूने दिनांक 13.10.2021 रोजी वर्तमानपत्रामध्ये जिल्ह्यात 22 आरोपी केले जेरबंद” या सदराखाली वृत्त प्रसारीत झाले आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रसार माध्यमातून बदनामी झाली आहे तरी याप्रकरणी ज्याच्या आदेशानुसार प्रशिध्दी पत्रक काढले गेले अशा दोषी पोलिस अधिकार्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी यामागणीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक औरंगाबाद यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष दिपक डोके यांनी प्रशिध्दिपत्रकाद्वारे दिली आहे.