कामगारांनी कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करण्याचे आवाहन
जालना
इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियमन व सेवाशर्ती व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियमन व सेवाशर्ती अंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे.
सरकारी कामगार अधिकारी, जालना या कार्यालयाअंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कामकाज हे कामगार भवन, दुसरा मजला, मा.फुलंब-ीकर नाट्यगृहाच्या बाजुला, बसस्टँड रोड जालना येथे चालते, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी, त्यांचे नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनेच्या लाभाचे वाटप इत्यादी कामकाज केले केले जाते. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांचे नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनेसाठी करावयाचे अर्ज सर्व कामकाज हे दिनांक 23 जुलै 2020 पासूनऑनलाईन प्रणालीद्वारे केले जात असुन यासाठी मंडळाने ुुु.ारहरलेलु.ळप हे संकेतस्थळ निर्माण केले आहे. या संकेतस्थळावरुन बांधकाम कामगारांना नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करण्यासाठी 37 रुपये एवढे वार्षिक शुल्क तर नुतनीकरणासाठी 12 रुपये एवढे वार्षिक शुल्क आकारले जाते व हे शुल्क ऑनलाईन प्रणालीद्वारे भरण्याची सुविधाही मंडळाने उपलब्ध करुन दिलेली आहे. त्याशिवाय ऑनलाईन प्रणालीद्वारे शुल्क जमा केल्यानंतर नोंदणी ,नुतनीकरण पावती ऑनलाईन जनरेट करण्याची सुविधाही मंडळामार्फत उपलब्ध करून दिलेली आहे. सदर नोंदणी, नुतनीकरण पावतीची ऑनलाईन प्रिंट काढून नोंदणीकृत बांधकाम कामगारास मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा फायदा घेता येतो. तसेच नवीन नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ओळखपत्र (स्मार्ट कार्ड) हे फक्त कार्यालयातूनच वितरीत करण्यात येते, इतर अनधिकृत कार्यालय, त्रयस्थ व्यक्ती, मध्यस्थी, दलाल, एजंट यापासून घेण्यात येऊ नये, असे आढळल्यास सबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.
मंडळामार्फत नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांसाठी शैक्षणिक सहाय्य योजना,आरोग्यविषयक योजना, आर्थिक सहाय्य योजन ,सामाजिक सुरक्षा योजना या शीर्षाखाली विविध स्वरूपाच्या 24 ते 25 योजना राबविल्या जात आहे. या सर्व योजनेचे लाभ ँऊ प्रणालीद्वारे बांधकाम कामगारांच्या खात्यावर थेट वर्ग केले जातात. याशिवाय मंडळामार्फत नोंदीत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप केले जाते. मंडळाच्या वरील सर्व योजना मोफत असुन त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगार हे सर्वात मोठ्या असंघटित वर्गात येतात. करिता सरकारी कामगार अधिकारी, जालना यांचे मार्फत सर्व बांधकाम कामगारांना आवाहन करण्यात येते कि, त्यांनी मंडळाकडे आपली नोंदणी करून त्यांच्यासाठी असलेल्या योजनेचा फायदा घ्यावा. त्यासाठी थेट मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक ती माहिती घ्यावी किंवा ुुु.ारहरलेलु.ळप या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी, नुतनीकरण व विविध योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्यावी. तसेच त्रयस्थ व्यक्ती, मध्यस्थी, दलाल, एजंट यापासून आपली फसवणूक टाळण्याचे आवाहन सरकार कामगार अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.