बदनापूर तालुक्यातील रस्ते व नदी खोलीकरण कामांस मंजुरी

जालना,

बदनापूर तालुक्यातील पाणंद, शेत, वस्ती रस्ते आणि नदी- नाला खोलीकरणाची कामे मग्रारोहयो तून करण्यासाठी युवा सेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या मागण्या रोजगार हमी व फलोत्पादन मंञी ना. संदीपान भुमरे यांनी मंजुर केल्या असून मंजूरी चे पञ जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

बदनापूर तालुक्यात ग्रामीण भागातील दळणवळणासह पाणी साठा वाढीच्या दृष्टीने महत्त्वापूर्ण असलेल्या विकास कामांबाबत माहिती देतांना भाऊसाहेब घुगे यांनी सांगितले की, भराडखेडा, अकोला निकळक, अन्वी, राळा, लक्ष्मण नगर, सोमठाणा, चित्तोडा येथील पानंद व शेत वस्ती रस्त्यांच्या कामांची अंदाजपत्रके मार्च महिन्यात सा. बां. उपविभागीय अभियंत्यांनी तहसीलदारांकडे मंजुरी साठी सादर केली. त्यास अद्याप पयर्ंत प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने विकास कामे रखडली असल्याचे भाऊसाहेब घुगे यांनी ना. संदीपान भुमरे यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रलंबित प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात याव्यात असे नमूद करत भाऊसाहेब घुगे यांनी वरील गावांमध्ये नदी- नाल्यांचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यासाठी जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आदेशीत करावे. अशा मागण्या रोजगार हमी व फलोत्पादन मंञी ना. संदीपान भुमरे यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केल्या होत्या. ना.भुमरे यांनी दखल घेत जिल्हाधिकार्‍यांना कार्यवाही करण्या बाबत आदेश दिले आहेत. अशी माहिती भाऊसाहेब घुगे यांनी दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!