विद्यार्थ्यांनी आभासी जगाऐवजी मैदानी खेळाची कास धरावी !यंग जायंट्स ग्रुप च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात योग प्रशिक्षक मनिष कवडी यांचा सल्ला

जालना,

कोवीड मुळे ऑनलाईन झालेल्या शिक्षण व्यवस्थेसोबत विद्यार्थी विविध समाज माध्यमे,भ-मणध्वनी वरील व्हिडिओ गेम्स यात गुरफटून गेले आहेत. मानसिक व शारिरीक विकासास बाधक असलेल्या आभासी दुनियेतून बाहेर पडून विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाची कास धरावी. असा सल्ला रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचलित चैतन्य योग केंद्राचे योग प्रशिक्षक मनिष कवडी यांनी येथे बोलतांना दिला.
यंग जायंट्स ग्रुप तर्फे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे आयोजित बॅडमिंटन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते .यावेळी प्राचार्या हेमा सोनटक्के, श्री. दापके, उपप्राचार्य मनिष दशरथ,अ‍ॅड.वृंदा सद्गुरे, अ‍ॅड. सिताराम धन्नावत,प्रायोजक अतुल लढ्ढा, श्रीकांत चिलकरवार, विनीत निमोदिया, गोपाल मानधना, सुमीत तिवारी, अंकुश सोनवणे, बद्रीनाथ चव्हाण,
अ‍ॅड .महेश धन्नावत, क्रीडा शिक्षक गौरव धोञे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात ग्रुप च्या फेडरेशन अधिकारी अ‍ॅड. अश्विनी धन्नावत यांनी कोरोना परिस्थितीमुळे खंड पडलेल्या क्रीडा क्षेत्रास पुन्हा उभारी देण्यासाठी ग्रुप ने केलेल्या प्रयत्नास खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच प्रायोजकांनी मोलाचे सहकार्य केल्या स्पर्धा यशस्वी झाल्या. असे अश्विनी धन्नावत यांनी सांगितले . सुञसंचालन प्रकल्प प्रमुख अक्षय धोंगडे ( जैन) यांनी केले तर अध्यक्ष बॉबी अग्रवाल यांनी आभार मानले.दोन दिवस चाललेल्या स्पधार्ंत ऐंशी सामने खेळवण्यात आले. पंच म्हणून नागोजी चिलकरवार ,दीपाली चिलकरवार, विक्रांत चिलकरवार, यांनी काम पाहिले तर यशस्वीतेसाठी सचिव शुभम गाढवे पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, कोषाध्यक्षा मानसी बाफना, प्रकल्प प्रमुख प्रदुम्न मानधना,सदस्य कस्तुरी धन्नावत, अमर पवार, चिराग बाफना, ॠतुजा भंडारी,
प्रियाणी अग्रवाल, सलोनी बोरा, शुभम कोडगावकर, धनंजय डिक्कर, वैष्णवी पवार, अनंता देशमुख, यांनी परिश्रम घेतले.
स्पधार्ंचे विजेते पुढील प्रमाणे वैयक्तिक 10ते 13 वयोगट : सक्षम दाभाडकर, श्रद्धा वायाळ, 14 ते 17 वयोगट: अभिजीत दांडगे, प्रिशा गिंदोडिया, 18ते 21 वयोगट: राघव दशरथ, शारदा सोनुने, दुहेरी गटात ( 14 ते 17) : अभिजीत दांडगे, अभय म्हस्के, भक्ती सचदेव, प्रिशा गिंदोडिया, ( 18 ते 21) : माधव चेचाणी, रोहन कावले, दुहेरी सामने 21वर्षे व पुढील वयोगट : दत्तात्रय वाघुंडे, शशांक बगडिया, 21 वर्षे पुढील एकञित दुहेरी सामन्यांत समाधान डोंगरे व श्रृती श्रीसुंदर हे विजेते ठरले. प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख पारितोषिके देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!