खो-खो खेळाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी खेळाडू निवड चाचणी आयोजन
जालना,
केंद्रशासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत खेलो इंडिया या योजनेमधून देशातील विविध जिल्हयामध्ये 1 हजार खेलो इंडिया सेंटर पुढील 4 वर्षामध्ये निर्माण करण्यात येणार आहे.
आयुक्त (खेलो इंडिया) यांना सादर केलेल्या प्रस्तावातील महाराष्ट्रातील प्रति जिल्हा एक खेळ याप्रमाणे खेलो इंडिया सेंटरसाठी मान्यता दिलेली आहे. जालना जिल्हयासाठी खो-खो या खेळाच्या केंद्राकरिता मान्यता देण्यात आलेली आहे.
जालना जिल्ह्यातील खेलो इंडिया केंद्रासाठी खेळाडु निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले असुन जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळेमधील शारीरिक दृष्ट्या सक्षम,उंच, लवाचिक, चपळ, चाणाक्ष, चांगली दक्ष क्षमता असणार्या 12 वषार्ंआतील 15 मुले व 15 मुलींची निवड करण्यात येणार आहे. अशा प्रकारणे गुण असणार्या आपल्या शाळेतील, गावातील, परिसरातील विद्यार्थ्यांना दिलेल्या तारीख व वेळेनुसार उपस्थित करण्यात यावेत.
निवड चाचणीचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल सर्व्हे नं. 488, पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर, जालना या ठिकाणी सकाळी 8.30 वाजता 12 वषार्ंच्या आतील मुले व मुली जालना, परतुर तालुक्यासाठी दि. 11 ऑक्टोबर 2021 रोजी, अंबड, घनसावंगी व मंठा तालुक्यासाठी दि. 13 ऑक्टोबर 2021 रोजी तर भोकरदन, जाफ्राबाद व बदनापुर तालुक्यासाठी दि. 14 ऑक्टोबर 2021 रोजी दि. 14 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित केले आहे.
अनिवासी खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रासाठी निवड झालेल्या 15 मुले व 15 मुली खेळाडूंना तज्ञ क्रीडा मार्गदर्शकामार्फत खो-खो खेळांचे अविरत वर्षभर जिल्हा क्रीडा संकुल जालना येथे दोन सत्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच त्या खेळाडूंना क्रीडा साहित्य, गणवेश, स्पर्धेकरिता लागणारा खर्च केंद्रशासनामार्फत करण्यात येणार आहे.
कोरोना-19 च्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावेत, निवड चाचणीसाठी येणार्या खेळाडूंना खो-खो खेळाच्या क्रीडा गणवेशामध्ये, सोबत जेवणाचा टिफीन, पाणी बॉटल, मास्क असणे आवश्यक आहे. तसेच खेळाडूने सोबत आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र झेरॉक्स व एक पासपोर्टसाईज फोटो आणावे.
जिल्हास्तर खेलो इंडिया केंद्रासाठी निवड चाचणी करिता आपल्या शाळेतील निवडक खेळाडू सहभागी आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, खेलो इंडिया केंद्र, जालना, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, जालना व जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांच्याकडून करण्यात येत आहे.