जलसमाधी घेणारे रासप कार्यकर्ते पोलीसांच्या ताब्यात..

जालना,

जालना शहरालगत रोहनवाडी मार्गावर कुंडलिका नदीवरील पुलाच्या नवनिर्माणासाठी जलसमाधी आंदोलन करणार्‍या रासप चे नेते ओमप्रकाश चितळकर यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुक्रवारी ( ता. 01) पोलीसांनी वेळीच ताब्यात घेतले.

घनसावंगी सह शंभर गावांना जोडणार्‍या कुंडलिका नदीवरील पूलाची निर्मीती करण्यासाठी रासप नेते ओमप्रकाश चितळकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी निवेदने देऊन वारंवार पाठपुरावा केला होता. तसेच रासपने ग्रामीण भागात स्वाक्षरी मोहीम ही राबविली.

मात्र प्रशासनाकडून सदर पुल नवनिर्मीतीसाठी काहीच हालचाली होत नसल्याने दोन दिवसांपूर्वी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सतर्कता बाळगत सकाळ पासून च नदी च्या दोन्ही बाजूंनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खेडकर स.पो.नि.राठोड यांच्या सह कर्मचारी नदी काठी तळ ठोकून होते.

सकाळी दहा वाजता रासपचे मराठवाडा संपर्क प्रमुख अशोक लांडे, जिल्हा प्रभारी ओमप्रकाश चितळकर, इंजि. बाबासाहेब भोजने, जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले, अ‍ॅड. श्रीराम हुसे, अ‍ॅड. संभाजी चुनखडे, माजी पं. स. सदस्य पुंजाराम खरजुले, अ‍ॅड. हनुमान काळे, विठ्ठल सातपुते, राजू वाढेकर, विष्णू चोरमारे, मैंद, काटकर यांच्या सह पदाधिकारी , रोहनवाडी, लोंढे वाडी येथील ग्रामस्थ नदी काठी दाखल झाले.

पुलाची नवनिर्मीती झालीच पाहिजे,,,,पुलाचे काम न करणार्‍या प्रशासन आणि गुत्तेदाराचा धिक्कार असो…,, महादेव जानकर आप आगे बढो ..,,हम तुम्हारे साथ है…!राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय असो…अशा गगन भेदी घोषणा देत पदाधिकारी व आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. नदीच्या पुलावर आंदोलक असल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिले.

चौकट…

सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा: चितळकर

जालना ते घनसावंगी या राज्य मार्गाचे काम पूर्ण झाले मात्र जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या शहरालगत च्या पुलाचे काम जाणीवपूर्वक रखडले आहे.पावसाळ्यातील दुर्घटनांची

रासपने जाणीव करून दिल्या नंतर ही पुलाची निर्मीती झाली नाही. परिणामी दुचाकी स्वारांचे बळी गेले.असून संबंधित गुत्तेदारास काळ्या यादीत टाकून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी रासप नेते ओमप्रकाश चितळकर यांनी यावेळी केली. या मार्गावर शाळा असून शहरास दुध, भाजीपाला, फळे रोहनवाडी सह परिसरातून येतात. शंभर गावातील ग्रामस्थ, रुग्णवाहिका,दररोज या मार्गाने येतात. असे नमूद करत प्रशासन आणखी किती बळी घेणार असा सवाल चितळकर यांनी केला. मुसळधार पावसाने. पुलावरील वाहतूक दहा दिवस बंद होती.आता तातडीने दहा फुट उंच पुल उभारावा नसता अधिक तीव- आंदोलन केले जाईल. असा इशारा ही ओमप्रकाश चितळकर यांनी दिला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!