केंद्र पुरस्कृत क्षेत्रीय कामाच्या पडताळीसाठी नॅशनल लेवल मॉनिटरची आढावा बैठक संपन्न

जालना,

केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा व क्षेत्रीय कामाच्या पडताळणीसाठी नॅशनल लेवल मॉनिटरचे मनोज दिक्षित व शैलश कुमार यांनी दि. 29 सप्टेंबर 2021 रोजी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जालना यांच्या दालनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद जालना, गट विकास अधिकारी, रो.ह.यो, प्रकल्प अधिकारी, पंतप्रधान आवास योजना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जालना, तहसिलदार, संजय गांधी योजना, जिल्हाधिकारी कार्यालय जालना, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद जालना, कार्यकारी अभियंता बांधकाम, कार्यकारी अभियंता पंतप्रधान सडक योजना, अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय इत्यादी कार्यालय प्रमुखांची आढावा बैठक घेतली.

नॅशनल लेवल मॉनिटरचा चमु दि. 29 सप्टेंबर 2021 ते 6 ऑक्टोबर 2021 या कालावधीत भोकरदन, घनसावंगी, जाफ्राबाद व मंठा तालुक्यातील निवडक एकुण दहा गावांमध्ये महाराष्ट्र रोजगार हमी योजना, महाराष्ट्र राज्य जीवनोत्ती अभियान पंतप्रधान आवास योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, पंतप्रधान सडक योजना इत्यादी केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत झालेल्या कामांना भेटी देऊन लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती जिल्हा ग्रामीण विका यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!