सत्ता शक्तीच्या वाढत्या हस्तक्षेपाचे ज्ञानात्मक संस्थांसमोर आव्हान :जेष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे

जालना,

शरीराच्या रचनेप्रमाणे मानवी समूहाच्या संस्था आहेत ज्या प्रदेश, भौगोलिक सीमा, राष्ट्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर वातावरण पाहून निर्णय घेण्यासाठी राज्यकर्त्यांना प्रांजळ व निर्भीड सल्ले देतात. सध्या अशा ज्ञानात्मक संस्थांमध्ये कुरघोडी करण्याचे धक्कादायक प्रकार सुरू आहेत सत्तास्थानी असलेल्या शक्ती अशा संस्थांचे व्यवहार विस्कटावेत, आपल्या सोयीनुसार त्या चालाव्यात यासाठी प्रयत्न करत असून सत्तेतील शक्तींचा वाढता हस्तक्षेपामुळे ज्ञानात्मक संस्था टिकवणे खडतर होत जाणार आहे .अशी भीती ज्येष्ठ साहित्यिक प्रा रंगनाथ पठारे यांनी आज येथे बोलताना व्यक्त केली.

मराठवाडा साहित्य परिषदेचा 78 वा वर्धापन दिन जालन्यात उत्साही वातावरणात संपन्न झाला. यानिमित्त बुधवारी ( ता. 29) अंकुशराव टोपे महाविद्यालयात आयोजित सत्कार सोहळ्यात प्रा. रंगनाथ पठारे बोलत होते. अध्यक्षस्थानी मसापचे केंद्रीय अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील हे होते. या वेळी स्वा. सै. पांडुरंग मोहरीर, दादा गोरे ,प्रा.किरण सगर ,कुंडलिक अतकरे ,प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड, मसाप जालना चे अध्यक्ष प्रा. रमेश भुतेकर ,सचिव पंडित तडेगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा.रंगनाथ पठारे यांनी जागतिक पातळीवर पोहोचलेल्या मराठी भाषेतील साहित्यिक, कवी साहित्यिक संस्था यांचा शासन कर्त्यां कडून केवळ अनुदाना पुरता संबंध ठेवला जातो. अन्य राज्यांत कॅबिनेट मंर्त्याचा दर्जा दिला जातो मात्र जगात पहिल्या नऊ भाषांमध्ये असलेल्या मराठी भाषेत तील लेखकांना व्यवहारात किंमत दिली जात नसून सर्वोच्च स्थानही नसल्याची खंत प्रा. पठारे यांनी व्यक्त केली. साहित्य व साहित्यिक समाज जीवनावर प्रभाव पाडू शकतात. अशी धास्ती राज्यकर्त्यांना असते तेवढी उंची पुन्हा गाठावी लागेल यासाठी मसाप ने दिलेल्या प्रयत्नांची दिशा उर्वरित महाराष्ट्राने अंगीकारावी संस्थांमधून साहित्याचे व्यवस्थापन होत असल्याने सर्व अशा संस्था टिकण्यासाठी दक्ष रहावे असे आवाहन ही प्रा. रंगनाथ पठारे यांनी केले.

प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी साहित्य, आत्मचरित्रे यांत वैयक्तिक पेक्षा वस्तुनिष्ठ अनुभूती असावी, असे नमूद करत ठाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली मसाप ने केलेली भरभराट, आपण पाहिली असून साहित्य चळवळींना तटस्थ भूमिका व साक्षी भावनेतून बलस्थाने आणि उणिवा पाहणे हे महत्त्वाचे असल्याचे डॉ बी. आर. गायकवाड यांनी सांगितले.

प्रास्ताविकात केंद्रीय कार्यकारिणी संचालिका डॉ. संजीवनी तडेगांवकर यांनी जीवनाचे प्रयोजन सापडलेल्यांसाठी हा सोहळा असल्याची भुमिका स्पष्ट केली. अस्थिर समाजास दिशा देण्याचे काम मसापने केले . असे सांगून कठीण परिस्थितीत तग धरून असलेली माणसे इथे असून जालना शाखेच्या नूतन कार्यकारिणी ने कविसंमेलने, ग्रंथ प्रकाशने, संगीत,नाट्यप्रयोग, यासोबतच अंक घरपोच देण्याची व्यवस्था केली आहे. केंद्रीय कार्यकारिणी ने आर्थिक व मानसिक पाठबळ द्यावे अशी अपेक्षा डॉ संजीवनी तडेगांवकर यांनी व्यक्त केली.

स्वातंर्त्यसैनिक पांडुरंग मोहरीर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .प्रा पंडित रानमाळ यांनी प्रा रंगनाथ पठारे यांचा परिचय सांगितला. सूत्रसंचालन प्रा रंगनाथ खेडेकर यांनी केले तर कोषाध्यक्ष कवी कैलास भाले यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. ॠषिकेश कांबळे, जीवन कुलकर्णी, देविदास फुलारी, संतोष तांबे ,मुकुंदराज सोळुंके, अरूण जाधव, आर. आर. खडके, डॉ.शिवाजी मदन, गोविंद प्रसाद मुंदडा, विनीत साहनी, ओमप्रकाश चितळकर, डॉ.सुनंदा तिडके, एस. एन. कुलकर्णी,डॉ. संदीप पाटील, डॉ.सुधाकर जाधव ,प्रा. पांडुरंग खोजे,सरोज देशपांडे, डॉ. ज्योती धर्माधिकारी, दिगंबर कदम, राम गायकवाड,

प्रा. बसवराज कोरे, डॉ. संभाजी पाटील, राजेभाऊ मगर, डॉ.दिगंबर दाते,डॉ. भोरे, प्रा. शशिकांत पाटील, विष्णू ससाणे,डॉ. कार्तिक गावंडे, डॉ. दादासाहेब गिर्‍हे, प्रा.सुरेखा मत्सावर, यांच्यासह मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय तसेच आठही जिल्ह्यातील पदाधिकारी ,

साहित्यिक, कवी आणि रसिकांची उपस्थिती होती.

मराठी व दलित साहित्याचे मराठवाडा उगमस्थान: ठाले पाटील

654 वर्षे कोंडीत असलेल्या मराठवाड्यातच मराठी व दलित साहित्याचा उगम झाला. असा दावा मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी अध्यक्षीय समारोपत केला मूळ महाराष्ट्र म्हणजेच मराठवाडा असून उर्वरित भाग म्हणजे बृहण मराठवाडा असल्याची टिप्पणी त्यांनी केली.सवार्ंच्या सहकार्याने यशस्वी वाटचाल केली असे सांगून गुणवत्तेला शत्रू असतात त्याप्रमाणे एक गट घाव घालण्याचा प्रयत्न करतोय .असेही ठाले पाटील यांनी नमूद केले. दबदबा निर्माण करण्यासाठी बाहेरच्या साहित्यिक ,कवी रसीकांना काय वाटते,याचा विचार करून त्यांना ही स्थान द्या असा सल्ला ही कौतिकराव ठाले पाटील यांनी दिला.

व्यास आपलेच आहेत…!

प्रा. रंगनाथ पठारे यांनी सुरुवातीलाच व्यासपीठ हा शब्द उच्चारला. काहीजण विचारपीठ म्हणतात, परंतु जगात सर्वप्रथम पाच हजार वषार्ंपूर्वी निर्माण झालेलं महाभारत हे महाकाव्य महर्षी व्यास या कवीने लिहिले असून त्यातील राजकारण समाज जीवन घटना ह्या स्थल,काल परत्वे आजपयर्ंत टिकून आहेत. संपूर्ण भारत वर्ष प्रभावित झालेल्या महाभारता मुळे भारतवासीयांना एकसंघ बांधून ठेवले असून व्यासपीठ म्हणण्यास साहित्यिक,कवींना हरकत नसावी. अशी भूमिका प्रा. रंगनाथ पठारे यांनी मांडली. सोबतच विचार पीठ म्हणण्याचा निर्णय आपण च घ्यावा असे ही त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!