आरोग्य विभागाची परीक्षा 24 आणि 31 ऑॅक्टोबरला, राजेश टोपेंची घोषणा

जालना,

हॉल तिकीटांमध्ये घोळ झाल्यामुळे रद्द करण्यात आलेली महाराष्ट्र आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. पण, अखेर आता नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. गट क ची परीक्षा 24 ऑॅक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑॅक्टोबरला घेतली जाणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामार्फत घेतली जाणारी गट क आणि गट ड पदाची परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा आदल्या दिवशी करण्यात आली. ही घोषणा होण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी घरातून बाहेर पडले होते, काही विद्यार्थी पोहोचले होते तर काहीजण प्रवासात होते. आयत्या वेळी परीक्षा रद्द करण्याची घोषणा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. अनेकांच्या वेळेचं आणि पैशांचंही नुकसान झालं होतं. त्याबाबत दिलगिरी व्यक्त करत आज नवी तारीख जाहीर झाली आहे.

आरोग्य विभागाच्या गट क ची परीक्षा 24 ऑॅक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑॅक्टोबरला होणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केली आहे.

आज दुपारी परीक्षा घेण्याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर परीक्षांची तारीख ठरवण्यात आली आहे. रविवार असल्यामुळे शाळा या बंद असणार आहे. त्यामुळे सर्व शाळा या उपलब्ध असणार आहे. सर्व शाळा आणि सेंटरची यादी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी हॉल तिकीटं दिली जाणार आहे, असंही राजेश टोपेंनी सांगितलं.

तसंच, विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, काही लोक चुकीची काम करण्याचा प्रयत्न करता, काही लोक वावड्या उठवत असतात,  त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा अफवांना बळी पडू नये,  जर कुणी असं करताना आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही टोपे यांनी दिला.

ही परीक्षा घेण्याचं काम सरकारनं न्यासा कंपनीला दिलं आहे. मात्र या कंपनीचा पूर्वइतिहास वादग-स्त आहे. पंजाबमधील ढिसाळ कामगिरीबद्दल या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायालयानं या कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढलं. यापूर्वी अनेक  घोळ घातलेल्या या कंपनीला महाराष्ट्र सरकारनं आरोग्य विभागाच्या परीक्षांचं काम दिलं होतं. शिवाय त्यातील गोंधळाबद्दल यापूर्वी कुठलीही कारवाई केली नव्हती. त्याचा नाहक ताप वारंवार विद्यार्थ्यांना सहन करावा लागला होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!